Gudi Padwa 2021 Dessert Recipes: गुढीपाडव्याचा दिवशी घरी बनवा केशरी श्रीखंड आणि आमरस पूरी पाहा व्हिडिओसह पूर्ण रेसिपी
तुम्ही ही यंदा हे पदार्थ बनवणार असाल.आणि ते कसे बनवायचे याबाबत तुमच्या मनात थोडा गोंधळ असेल तर चिंता करू नका.आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास व्हिडिओ ज्यात तुम्ही या पदार्थाची रेसिपी पाहुन शिकू शकाल.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa). या चैत्र पाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी घरोघरी गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत केले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या सणाचा उत्साह काही औरच असतो. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचे जंगी स्वागत केले जाते.महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्येही पाडवा 'उगादी', 'चेटी चांद' या वेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.यंदा गुढीपाडवा मंगळवार, 13 एप्रिल रोजी आहे.गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक. हिंदू संस्कृतीत या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.कटू-गोड अशा मिश्र प्रसादाने नवीन वर्षाची सुरुवात केली जाते.यदिवशी घरात गोडधोडाचे जेवण बनवले जाते.खासकरुन आमरस पूरी आणि केसरी श्रीखंडाचा बेत वरच्या स्थानावर असतो. तुम्ही ही यंदा हे पदार्थ बनवणार असाल.आणि ते कसे बनवायचे याबाबत तुमच्या मनात थोडा गोंधळ असेल तर चिंता करू नका.आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास व्हिडिओ ज्यात तुम्ही या पदार्थाची रेसिपी पाहुन शिकू शकाल. चला तर मग पाहूयात. (Gudi Padwa 2021 Mehandi Design: हिंदू नववर्ष, गुढी पाडव्याच्या दिवशी हातावर काढा 'या' सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन्स )
आमरस पूरी सोपी रेसिपी
आमरस पूरी रेसिपी
केसर पिस्ता श्रीखंड रेसिपी
केसर इलायची श्रीखंड रेसिपी
गुढी हे आपल्या आनंदाचे, यशाचे, आरोग्याचे, संपन्नतेचे आणि समाधानाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे पूर्वी गावी मोठमोठ्या गुढ्या उभारल्या जायच्या. अजूनही गावी उंचच उंच गुढ्या उभारण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्या दिवशी कडूलिंब-साखरेचा प्रसाद खाल्ला जातो.