Gudi Padwa 2020 Mehendi Designs: गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून हातावर काढा 'या' सुंदर मेहंदी डिझाईन्स
यंदाही गुढीपाडव्यानिमित्त अनेक महिलांना, मुलींना हातावर मेहंदी काढण्याची इच्छा असेल पण त्यासाठी तुमच्या मनाला हव्या तशा डिझाईन्स नसतील तर तुम्ही दिलेल्या डिझाईन्सचा नक्की विचार करु शकता.
Gudi Padwa Simple Mehendi Design: जगभरातील तमाम मराठी हिंदू बांधवांसाठी 'गुढीपाडवा' (Gudi Padwa) हा सण म्हणजे नववर्षाची सुरुवात असते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रीयन लोक पारंपारिक वेशभूषा करुन, दाराला आंब्याची तोरणं लावून, दारात रांगोळ्या काढून, छान गुढी उभारून हा सण साजरा करतात. यादिवशी लोक आपल्या घरी छान पंचपक्वानांचा बेतही करतात. या दिवशी महिलांची खूप लगबग सुरु असते. गुढीपाडव्यासाठी संपूर्ण साजश्रृंगार करुन, छान पारंपारिक पद्धतीने साड्य नेसून हा सण साजरा करतात. मग त्यात काही जणी आवडीनुसार हातावर नक्षीदार मेहंदी देखील काढतात.
यंदाही गुढीपाडव्यानिमित्त अनेक महिलांना, मुलींना हातावर मेहंदी काढण्याची इच्छा असेल पण त्यासाठी तुमच्या मनाला हव्या तशा डिझाईन्स नसतील तर तुम्ही दिलेल्या डिझाईन्सचा नक्की विचार करु शकता.
हेदेखील वाचा- Gudi Padwa 2020: 'गुढी पाडवा' सणाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या
गुढीपाडवा हा सण संस्कृती, परंपरा जपण्याचा, नाती जपण्याचा असतो. या दिवशी तुम्ही एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन मनातील सर्व अढी बाजूला ठेवून हा सण आनंदाने साजरा करू शकता. हीच खरी तुमच्या नववर्षाची चांगली सुरुवात असेल. नाही का!