Gudi Padwa 2020 Shrikhand Recipes: गुढीपाडव्याचे औचित्य साधून घरी नक्की ट्राय करा केसर, स्ट्रॉबेरी पासून बनवलेल्या '5' लज्जतदार श्रीखंडाच्या रेसिपीज, Watch videos

इतकेच नव्हे तर या श्रीखंडामध्ये काहीतरी वेगळेपण म्हणून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड देखील बनवू शकता. ज्यात तुम्ही गोड फळांचा वापर करुन श्रीखंडाचा एक अनोखा प्रकार लोकांसमोर आणू शकता.

Shrikhand (Photo Credits: Wikimedia Commons)

Different Types Shrikhand Recipes: भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदेला 'गुढीपाडवा' म्हणतात. या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या दारात गुढी बांधतात. ही गुढी प्रेमाची, आपुलकीची, विजयाची असते असे पुराणात सांगण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महिला घरात गोडाधोडाचा बेत करतात. यात काही जणी पुरणपोळी, काही जणी म्हालपोहा करतात तर काही जण खीर. या सगळ्या मध्ये गुढीपाडव्याला (Gudi Padwa) सर्वात जास्त आणि महत्वाचा बेत ठरतो श्रीखंड-पुरीचा. यात बरेच बाहेरून दुकानातून श्रीखंड विकत आणतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या सावटामुळे लोकांनी घराबाहेर जाणे टाळले. अशा वेळी श्रीखंडाचा यंदाचा बेत फिस्कटेल असे अनेकांना वाटत असेल.

पण असे काही होणार नाही. तुम्ही घरच्या घरी छान घरगुती पद्धतीने श्रीखंड बनवू शकता. इतकेच नव्हे तर या श्रीखंडामध्ये काहीतरी वेगळेपण म्हणून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड देखील बनवू शकता. ज्यात तुम्ही गोड फळांचा वापर करुन श्रीखंडाचा एक अनोखा प्रकार लोकांसमोर आणू शकता. Gudi Padwa 2020: यंदा गुढीपाडव्या निमित्त गुढी कशी उभाराल?

पाहा श्रीखंडाच्या काही हटके रेसिपीज:

केसर पिस्ता श्रीखंड

चॉकलेट श्रीखंड

हेदेखील वाचा- Gudi Padwa 2020 Date: यंदा 25 मार्चला गुढीपाडवा दिवशी साजरा करा हिंदू नववर्ष!

ड्राय फ्रूट श्रीखंड

स्ट्रॉबेरी श्रीखंड

आम्रखंड

श्रीखंड हे गोडाचा असा पदार्थ आहे जो लहानग्यांसोबत मोठ्यांनाही तितकाच आवडतो. म्हणून तुम्ही जी मुलं फळं खाण्यास टाळाटाळ करत असतील त्यांना अशी पद्धतीने श्रीखंड बनवून देऊन शकता. झटपट होणा-या या रेसिपीज घरी नक्की ट्राय करा.