Gold Rate Today: अक्षय्य तृतीये दिवशी मुंबई, पुणे यांसह महत्त्वाच्या शहरांमध्ये काय आहे सोन्याचा दर?
मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बाहेर पडून सोने खरेदी करता येणार नाही. मात्र ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सोन्याची खरेदी नक्कीच करु शकता.
Gold Rate on Akshaya Tritiya 2020: आज अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त. या दिवशी तुम्ही जे काम कराल ते अक्षय्य होते म्हणून या दिवशी चांगली, शुभ काम करण्याकडे लोकांचा भर असतो. या दिवशी अनेक शुभकार्य पार पाडली जातात. तर सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. अक्षय्य तृतीये निमित्त सोने खरेदीसाठी लोकं प्रचंड गर्दी करतात. मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बाहेर पडून सोने खरेदी करता येणार नाही. परंतु, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सोन्याची खरेदी नक्कीच करु शकता. यासाठी काही ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. तर अनेक सराफांनी देखील ग्राहकांसाठी ऑनलाईन माध्यमातून सोने विक्री सुरु ठेवली आहे. (अक्षय्य तृतीये निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून साजरा करा हा शुभ दिवस!)
कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला असून गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार दिसून येत आहेत. अक्षय्य तृतीये निमित्त सोन्याचं वळं, Gold Coin आणि दागिने यापैकी तुम्ही काय खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा दर. (Akshaya Tritiya 2020 निमित्त ऑनलाईन सोने खरेदी करण्यासाठी '5' पर्याय!)
आजचा सोन्याचा दर:
शहर |
24 करेट/प्रतितोळा |
22 करेट/प्रतितोळा |
मुंबई | 45,589 रुपये |
44,559 रुपये |
पुणे |
47,524 रुपये |
45,264 रुपये |
नाशिक |
47,485 रुपये |
45,215 रुपये |
नागपूर |
47,524 रुपये |
45,214 रुपये |
सोलापूर |
47,475 रुपये |
45,225 रुपये |
(वरील सोन्याचा दर goldpriceindia.com नुसार प्रतितोळा 24 कॅरेट आणि 22 कॅरेट असा देण्यात आला आहे.)
देशात कोरोना व्हायरसचे संकट वाढताना दिसत आहे. रुग्णंसख्या, मृतांचा आकडा वाढत असल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. भारतात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 24 हजारच्या पार गेला असून 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.