Lalita Panchami 2024 Wishes In Marathi: ललिता पंचमी निमित्त Quotes, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारे प्रियजनांना द्या खास शुभेच्छा!

ललिता पंचमी निमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला Quotes, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारा शुभेच्छा देऊन नवरात्रीतील खास दिवस साजरा करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Lalita Panchami 2024 Wishes In Marathi 6 (Photo Credit - File Image)

Lalita Panchami 2024 Wishes In Marathi: ललिता पचमी (Lalita Panchami 2024) हा एक शुभ दिवस आहे जो ललिता देवीच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हा सण अश्विना महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या तिथीला (पंचमी तिथी) साजरा केला जातो. या शुभ दिवशी भाविक उपवास करतात. हे व्रत उपांग ललिता व्रत या नावाने प्रसिद्ध आहे. यंदा ललिता पंचमी 7 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.

ललिता पंचमीला खूप महत्त्व आहे. हा दिवस देवी ललिता यांना समर्पित आहे. ललिता देवी त्रिपुरा सुंदरी आणि षोडशी या नावानेही ओळखली जाते. नवरात्रीच्या काळात ललिता पंचमीच्या दिवशी विशेष व्रत पाळले जाते. ललिता पंचमी निमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला Quotes, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारा शुभेच्छा देऊन नवरात्रीतील खास दिवस साजरा करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Lalita Panchami 2024 Wishes In Marathi 1 (Photo Credit - File Image)

नवरात्रीच्या या मंगल समयी देवी
तुम्हाला सुख, समाधान,
आनंद आणि यश प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो...
ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Lalita Panchami 2024 Wishes In Marathi 2 (Photo Credit - File Image)

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो...
हीच मातेकडे प्रार्थना…
ललिता पंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Lalita Panchami 2024 Wishes In Marathi 3 (Photo Credit - File Image)

नवी कल्पना, नवी ज्योत्स्ना
नवी शक्ती, नवी आराधना
ललिता पंचमीच्या शुभ प्रसंगी
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Lalita Panchami 2024 Wishes In Marathi 4 (Photo Credit - File Image)

शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना
सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी
आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना…
ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Lalita Panchami 2024 Wishes In Marathi 5 (Photo Credit - File Image)

दक्षिण भारतात ललिता देवीला चंडी म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की, जे भक्त उपांग ललिताचे व्रत करतात त्यांना सुख-समृद्धी प्राप्त होते. देवी भक्तांना यश आणि समाधानाचा आशीर्वाद देते. देवी ललिताला दोन हात असून ती कमळावर विराजमान आहे. तिचा विवाह भगवान शिवाशी झाला होता.