Dhammachakra Pravartan Din 2024 Wishes: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी WhatsApp Status, Quotes, Messages द्वारे बौद्ध बांधवांना द्या खास शुभेच्छा!

यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील.

Dhammachakra Pravartan Din 2024 Wishes 6 (Photo Credit - File Image)

Dhammachakra Pravartan Din 2024 Wishes: धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2024) हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी (Vijayadashami 2024) किंवा 14 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात.

अशोक विजयादशमीला म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. तेव्हापासून हा दिवस धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ईमेज, मेसेज, व्हॉट्सअॅप मेसेज द्वारे आपल्या बौद्ध मित्र-मैत्रिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त

देशातील सर्व बौद्ध बंधू-भगिनी आणि बांधवांना

कोटी कोटी शुभेच्छा

जय भीम नमो बुद्धाय

Dhammachakra Pravartan Din 2024 Wishes 1 (Photo Credit - File Image)

बुद्धाच्या चरणावरती

विजया दशमी दिनी

दिक्षा आम्हा दिली भीमाने

मंगल दिन तो जनी

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhammachakra Pravartan Din 2024 Wishes 2 (Photo Credit - File Image

मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला

भीमाने कोट्यावधींच्या काळजात बुद्ध कोरला

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना त्रिवार वंदन

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा !

Dhammachakra Pravartan Din 2024 Wishes 3 (Photo Credit - File Image)

काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य

परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य

दीक्षाभूमीच्या पायथ्याशी जगण्याचे धैर्य

चला एक मुखाने गाऊ माझ्या भीमाचे शौर्य

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Dhammachakra Pravartan Din 2024 Wishes 4 (Photo Credit - File Image)

तुझाच गौतमा प्रकाश पडे अंतरी

तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Dhammachakra Pravartan Din 2024 Wishes 5 (Photo Credit - File Image)

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन असेही म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते की, 'हिंदू धर्म चुकीच्या आदर्शांचा प्रसार करतो. हिंदू धर्म आपल्याला चुकीचे सामाजिक जीवन जगण्यास भाग पाडतो. हा धर्म सोडल्यानंतर आज मी पुनर्जन्म घेत आहे.' यासोबतच त्यांनी या दिवशी 22 प्रतिज्ञाही घेतल्या होत्या.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif