Lakshmi Pujan 2022 Wishes: लक्ष्मी पूजनानिमित्त WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा द्या मंगलमय शुभेच्छा!
यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
Lakshmi Pujan 2022 Wishes: दिवाळी, उत्साह, आनंद आणि प्रकाशाचा सण, यावर्षी सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. धनाची देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी या दिवशी घरामध्ये विशेष सजावट केली जाते. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीसह प्रथम पूजलेल्या गणेशाची, सरस्वती देवी, महाकाली आणि कुबेर देवतेची पूजा करण्याचा नियम आहे. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सण. प्रदोष काळात घर दिव्यांनी सजवले जाते आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. दिवाळीला शुभ मुहूर्तावर आणि योग्य पद्धतीने देवी लक्ष्मीची पूजा केल्यास त्या घरात लक्ष्मीचा वास होतो, असं म्हटलं जातं.
दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी सर्वांना आशीर्वाद देते. दिवाळीच्या संध्याकाळी शुभ मुहूर्तावर लक्ष्मी-गणेश, कुबेर आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनानिमित्त WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा तुम्ही आपल्या मित्र-परिवारास मंगलमय शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महालक्ष्मीचे करुनी पूजन,
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृद्धी,
लाभेल तुम्हा जीवनी
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!
समृद्धी यावी सोनपावली,
उधळणं व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून जावो,
लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!
पुराणानुसार, समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, तर वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी माता लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णूशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे.