Ghatasthapana 2024 HD Images: घटस्थापना आणि नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा,Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन जल्लोषात करा नवरात्रीची सुरूवात
नवरात्री मध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ देवींची पूजा केली जाते.
घटस्थापना (Ghatasthapana) हा नवरात्री (Navratri) मधील पहिला दिवस आहे. यंदा शारदीय नवरात्री (Shardiya Navratri) मधील पहिला दिवस 3 ऑक्टोबर दिवशी आहे. देवीच्या नऊ रूपांची पूजा अर्चना या घटस्थापनेच्या दिवसापासून सुरूवात होते. नऊ दिवस नऊ रात्रींची ही नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर करण्याचा एक सण आहे. शेतीप्रधान भारत देशामध्ये हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात येते. म्हणून या महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसात निर्मितीशक्तीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करण्याची पद्धत आहे. आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी नवरात्रारंभ, घटस्थापना असते. मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा WhatsApp Messages, Status, Stickers, Wishes, HD Images, Greetings शेअर करत देऊ शकता. त्यासाठी खाली दिलेली ग्रिटिंग्स डाऊनलोड करून शेअर करा.
नवरात्रारंभापासून नवरात्र संपेपर्यंत काही भाविक उपवास देखील ठेवतात. यामध्ये भाविक दिवसभर केवळ फळं आणि उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत पाळतात. या निमित्ताने शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ देवींची पूजा केली जाते. Ghatasthapana 2024: नवरात्री मध्ये घटस्थापना दिवशी रूजवण कशी केली जाते? घ्या जाणून.
घटस्थापनेच्या शुभेच्छा
- घटस्थापनेच्या मंगलमय पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा
- घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
- घटस्थापनेनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा
- घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
- शारदीय नवरात्रीमधील घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा
नवरात्री मध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करताना प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग परिधान केला जातो. यामागे धार्मिक मान्यता नाही पण महिलांमध्ये एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने हे नऊ दिवस नऊ रंग साजरे केले जातात.