Gauri Pujan 2020 Wishes: गौरी पूजन निमित्त मराठी Messages, Images, Whatsapp Status वर शेअर करुन द्या खास शुभेच्छा!
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्या दिवशी विसर्जन केले जाते.
Gauri Pujan Wishes 2020: भाद्रपदात गणपतीबाप्पाच्या आगमनानंतर काही दिवसांमध्ये घरोघरी गौराईचे आगमन होते. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्या दिवशी विसर्जन केले जाते.
पौराणिक कथेनुसार, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. सौभाग्यवतींना गौरी पूजन निमित्त मराठी Messages, Images, Whatsapp Status वर शेअर करुन खास शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा - Gauri Pujan 2020 Messages: यंदाच्या 'गौरी पूजना'ला खास मराठी Wishes, Images, WhatsApp Status, HD Images, Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन द्विगुणीत करा आनंद)
ज्येष्ठी गौरी आगमनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
गवर गौरी ग गौरी ग,
झिम्मा फुगडी खेळू दे,
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवधी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख समृद्धी,
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्येष्ठी गौरी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा!
परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. घरात गौरीचे आगमन झाल्यानंतर सर्व वातावरण प्रसंन्न होऊन जाते.