Ganesh Visarjan 2024 Wishes 6 (Photo Credit - File Image)

Gauri-Ganesh Visarjan Messages In Marathi:  गणेशभक्तांच्या घरी सात दिवसांच्या वास्तव्यानंतर गौरींसोबत गणपती बाप्पाचं देखील विसर्जन होणार आहे. आज 12 सप्टेंबरला गौरी-गणपतींचं विसर्जन (Gauri Ganpati Visarjan) होणार आहे. मनोभावे पूजा केल्यानंतर गणेशभक्त सातव्या दिवशी मोठ्या जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देतात. जितकी धामधूम बाप्पाच्या आगमनाला असते तितक्याच धूमधडाक्यात आणि जंगी मिरवणूकीमध्ये बाप्पाला निरोप दिला जातो. मग या गौरी-गणपतीच्या विसर्जनाला बाप्पाला निरोप देण्यासाठी खास शुभेच्छापत्र, Wishes, Quotes, Facebook Messages, WhatsApp Status शेअर करत या दिवसाचा आनंद तुम्ही शेअर करू शकता.

घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन 5 किंवा 7 व्या दिवशी होते. गौरी विराजमान झालेल्या घरातही गणपती बाप्पांचं विसर्जन सातव्या दिवशी किंवा गौरींसोबतच केले जाते. नक्की वाचा:  Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi: पाच दिवसीय गणपती विसर्जनानिमित्त Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून द्या लाडक्या बाप्पाला निरोप! 

गौरी गणपती विसर्जन मेसेजेस

निरोप देऊ आज आनंदाने
ओटी भरून खणा-नारळाने
आई! सेवा तुझी घे मानून
समाधानाने
ज्येष्ठा गौरी विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा!
----------------------
ज्येष्ठा गौरी विसर्जनाच्या  मंगलमय शुभेच्छा!
--------------------
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया,
वरदहस्त असू द्या माथी,
राहू द्या सदैव तुमची छत्रछाया,
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!
-------------------
डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू,
आनंदमय करून चालला तुम्ही,
पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही...
गौरी-गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा!
-------------------
गौरी-गणपती विसर्जनाच्या आज
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

गौराई या माता पार्वतीच्या रूपात येऊन बाल गणेशाला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी येतात अशी धारणा आहे. त्यामुळे हा निरोपाचा क्षण अनेक भक्तांना भावूक करणारा आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती गौरी-गणपतीच्या विसर्जनापूर्वी मंत्रोच्चाराने बाप्पाच्या मूर्ती मध्ये केलेली प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातील देवत्त्व काढून घेतात. निरोपाची एकत्र आरती म्हणून बाप्पाला विसर्जनाला नेले जाते. शाडूची माती किंवा पर्यावरणपूरक वस्तूंनी घडवलेल्या गणेशमूर्तींचं देखील घरातच विसर्जन केले जाऊ शकतं.