Gauri Avahan Wishes: गौरी आवाहनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून देत खास करा माहेरवाशिणींचा सण

गौरीला (पार्वती देवीचे रूप) माहेरवाशिणीच्या रूपात घरी आणले जाते. गणपती बाप्पा सोबत गौरी घरी आल्याने घरात आनंद, सुख-समृद्धी आणि चैतन्य निर्माण होते, अशी श्रद्धा आहे.

Gauri Aavahan Wishes

महाराष्ट्रामध्ये  गणपती बाप्पांसोबतच अनेक घरांमध्ये गौराईचेही घरात प्रेमाने आणि उत्साहाने स्वागत केले जाते. तिच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी आणि चैतन्य नांदते, अशी श्रद्धा पिढ्यानपिढ्या जपली जाते. पार्वती मातेच्या रुपाची या निमित्ताने पूजा केली जाते. गौराईचा सण हा माहेशवाशिणींसाठी एक महत्त्वाचा दिवस  असतो.  मग या गौरी आवाहनाच्या (Gauri Avahan) दिवशी WhatsApp Messages, Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Images च्या माध्यमातून गौरी आवाहनाच्या शुभेच्छा देत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.

गौरी ही भगवान शंकराची पत्नी पार्वती देवीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, भाद्रपद महिन्यात गौरी आपल्या माहेरी - म्हणजे भक्तांच्या घरी - काही दिवसांसाठी येते. मुलगी माहेरी आल्यावर जसा आनंद होतो, तसाच आनंद गौरीच्या आगमनाने घराघरात पसरतो. तीन दिवसांच्या या उत्सवात पहिल्या दिवशी आवाहन, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

Gauri Aavahan Wishes
Gauri Aavahan Wishes
Gauri Aavahan Wishes
Gauri Aavahan Wishes
Gauri Aavahan Wishes

 

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत गौरी सण साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोकणात गौरीला "ज्येष्ठा-कनिष्ठा" असेही संबोधले जाते, तर विदर्भात गौरीची पूजा वेगळ्या पद्धतीने होते. काही ठिकाणी गौरीसाठी खास दागिने, साड्या आणि शृंगार केला जातो, तर काही ठिकाणी पारंपरिक धान्याची रास आणि फराळाचे विशेष पदार्थ बनवले जातात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement