Gatari Wishes In Marathi For Husband: पतीला गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं, मजेशीर मेसेजेस

गटारी म्हणजे फक्त मांसाहारी जेवण नव्हे, तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण जगण्याची संधी आहे. पतीसोबत प्रेम, चविष्ट जेवण, मनमोकळ्या गप्पा आणि सुंदर आठवणींनी भरलेला हा दिवस अधिक खास बनवता येतो.

Gatari Wishes In Marathi For Husband: पतीला गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं, मजेशीर मेसेजेस
Gatari Wishes

यंदा श्रावण महिन्याची सुरूवात (Shravan Masaranbha) 13 ऑगस्ट पासून होणार आहे. श्रावणाच्या आधी अनेक घरांमध्ये गटारी पार्टी (Gatari Party) किंवा आखाड पार्टीचं (Akhad Party) आयोजन केले जाते. या निमित्ताने श्रावण आणि चातुर्मासामध्ये वर्ज्य असलेल्या मांसाहारावर ताव मारला जातो. घरातील सार्‍या मंडळींसोबत एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला जातो. पण यंदा श्रावणापूर्वीच्या रविवारी संकष्टी चतुर्थी आणि एकादशी आल्याने अनेकांना या गटारी पार्टी किंवा आखाड पार्टीचे बेत विक डेज मध्येच करावे लागणार आहेत. मग तुमच्या नवर्‍यासोबत यंदा गटारी पार्टी करणार असाल तर त्याला गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी या खास मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करत त्याच्यासोबत एक खास डेट प्लॅन करू शकाल.

आखाड पार्टीचा दिवस म्हणजे सार्‍या चमचमीत मांसाहारी पदार्थांवर ताव मारण्याचा दिवस. हिंदू पंचांगानुसार श्रावण हा व्रत वैकल्यांचा महिना असल्याने त्या दिवसांमध्ये मांसाहार टाळला जातो. मग आता याच काही श्रावणापूर्वीच्या दिवसांमध्ये मासे,मटण, चिकन चा आस्वाद घेत दोघंच गटारी पार्टी करणार असाल तर काय करू शकाल. नक्की वाचा: Gatari Celebration Ideas With Husband: गटारी पार्टी तुमच्या पतीसोबत सेलिब्रेट करण्यासाठी खास आयडिआज.

गटारीच्या शुभेच्छा

तुमची साथ आहे म्हणून प्रत्येक दिवस खास आहे.

आजचा दिवस तुमच्यासाठी अधिकच लज्जतदार असो.

गटारीच्या शुभेच्छा

 

 

आजचा दिवस मस्त चमचमीत बेताचा आणि आनंदाचा जावो. माझ्या अहोना गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या आयुष्यात प्रेमाचा गोडवा आणि आनंदाची चव आणणाऱ्या माझ्या पार्टनरला गटारीच्या खूप खूप शुभेच्छा.

श्रावण सुरू होण्याआधीचा हा आनंदाचा क्षण तुमच्यासोबत साजरा करायला मला खूप आवडेल. गटारी अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

संसाराच्या प्रत्येक वळणावर मला सांभाळून घेणाऱ्या माझ्या लाडक्या नवऱ्याला गटारीच्या लज्जतदार शुभेच्छा.

गटारी म्हणजे फक्त मांसाहारी जेवण नव्हे, तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण जगण्याची संधी आहे. पतीसोबत प्रेम, चविष्ट जेवण, मनमोकळ्या गप्पा आणि सुंदर आठवणींनी भरलेला हा दिवस अधिक खास बनवता येतो. श्रावणाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी गटारीचा आनंद एकमेकांसोबत थोडा खास वेळ एकत्र घालवत साजरा करा.

 

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2026 11:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).