Ganesh Visarjan 2021 Status: गणपती विसर्जन निमित्त मराठी Images, Greetings, Quotes शेअर करुन द्या बाप्पाला निरोप!

हे तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर शेअर करुन बाप्पाला निरोप द्या.

Ganpati Visarjan 2021 Images | File Image

Ganpati Visarjan Status in Marathi: भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते चतुर्दशी असा दिवसांचा गणेशोत्सव सध्या महाराष्ट्रात साजरा होत आहे. आज त्यातील सातवा दिवस. प्रत्येक घराच्या परंपरेनुसार दीड, पाच, सात  आणि दहा दिवस बाप्पा विराजमान होतात. आज गुरुवार, 16 सप्टेंबर रोजी 7 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. अतिशय उत्साहाने, आनंदाने आणलेल्या बाप्पाला निरोप देताना सर्वांचे मन भरुन येते. अशावेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर' या अशा घोषणा दिल्या जातात. बाप्पाच्या विसर्जनावेळी तुमच्या नातलग, मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Greetings, Quotes घेऊन आलो आहोत. हे तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर शेअर करुन बाप्पाला निरोप द्या.

ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे काही निर्बंध आहेत. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आपल्या हिताचे ठरणार आहे. कृत्रिम तलावात विसर्जन करणे, पर्यावरणपूरक मुर्ती, मखराचा वापर, कोरोना नियमांचे पालन यामुळे पुढील संकट टाळता येईल. (Ganpati Visarjan Dates 2021: दीड ते 10 दिवसांच्या गणपतींचं यंदा पहा कधी होणार विसर्जन)

गणपती विसर्जन मराठी संदेश:

Ganpati Visarjan 2021 Images | File Image
Ganpati Visarjan 2021 Images | File Image
Ganpati Visarjan 2021 Images | File Image
Ganpati Visarjan 2021 Images | File Image
Ganpati Visarjan 2021 Images | File Image

आयुष्यातील सर्व दु:ख घेऊन आणि भरभरुन आनंद देऊन बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा परतण्यासाठी त्याच्या गावी जाऊदे, अशी मनोकामना करुन बाप्पाला निरोप द्या. बोला 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.'