Ganpati Invitation Messages In Marathi Format: माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाच्या दर्शनाचं आप्तांना आमंत्रण देण्यासाठी खास मेसेजेस!
यंदा माघी गणेश जयंती (Ganesh Jayanti) 4 फेब्रुवारी, शुक्रवार दिवशी साजरी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात सध्या माघी गणेश चतुर्थीची (Maghi Ganesh Chaturthi) धामधूम सुरू आहे. अनेक घरांमध्ये भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणे माघी गणेश चतुर्थी अर्थात गणेश जयंती देखील मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. यंदा माघी गणेश जयंती (Ganesh Jayanti) 4 फेब्रुवारी, शुक्रवार दिवशी साजरी केली जाणार आहे. गणेश जयंती निमित्त तुमच्या घरातही जर गणपती बाप्पाचं आगमन होणार असेल तर त्याच्या दर्शनाला आप्तांना, नातेवाईकांना, प्रियजणांना आणि मित्रमंडळींना आमंत्रण देण्यासाठी लगबग सुरू असेल. पण यंदा कोविड 19 ची दहशत पाहता हा सण देखील साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्येच साजरा करण्यात शहाणपणं आहे. यंदादेखील तुम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी ऑनलाईन दर्शनाचं आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे हा सण सुरक्षित वातावरणामध्ये साजरा करण्याला हातभार लागेल.
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असली तरीही संकट पूर्णपणे टळलेले नाही त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळत ही माघी गणेश जयंती व्हर्च्युअली साजरी करण्यासाठी या आमंत्रणाच्या मेसेजेस सोबत जवळच्या व्यक्तींसोबत या सणाचा आनंद द्विगुणित करा. नक्की वाचा: Ganesh Jayanti 2022 Images & HD Wallpapers For Free Download Online: शेयर करा Maghi Ganesh Jayanti Wishes, SMS and Quotes For WhatsApp And Facebook.
गणेश जयंती आमंत्रण पत्रिका मेसेज
*llश्री* *गणेशाय* *नम:ll*
सालाबादा प्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे. या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
पत्ता:
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
माघी गणेश जयंती निमित्त आमच्या घरी विराजमान होणार्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला नक्की यायचं!
वेळ-
तारीख-
पत्ता -
गणेश भक्तांसाठी माघी गणेश चतुर्थी हा दिवस महत्त्वाचा आहे. गणेश जयंती हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस असतो. या दिवशी गणेशभक्त विधिवत गणरायाची पूजा करून नैवेद्याला गोडाचे जेवण बनवतात. प्रामुख्याने यामध्ये मोदकांचा समावेश असतो. तीळाचे मोदक देखील या दिवशी बनवण्याची पद्धत आहे.