Ganeshotsav 2021 Guidelines: घरगुती गणपतीची मूर्ती 2 फूटांची असावी; 'गणेशोत्सवा'साठी राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

त्यामुळे यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. राज्यात कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, शासनाने या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

Ganpati Festival (Photo Credits-Facebook)

प्रत्येकवर्षी मराठी व्यक्ती ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असते, तो म्हणजे गणेशोत्सव (Ganeshotsav 2021)! यंदा 10 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतरचे पुढील दहा दिवस उत्साहाने, आनंदाने, हास्याने भारलेले असतील. मात्र यावर्षीही या उत्सवावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट आहे. सध्या तर देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत आहे व पुढे तिसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. राज्यात कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, शासनाने या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावात सार्वजनिक गणपती मंडळे अगदी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. या दहा दिवसांमध्ये पुण्या-मुंबई सारख्या शहरांचे तर संपूर्ण रूपच पालटते. मात्र यंदाही अशा मंडळांवर अनेक मर्यादा आल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारने पुढील मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत -