Ganeshotsav 2019: गणपती विसर्जनावेळी ठेवा शहराचे रंगरूप अबाधित; प्रत्येकानेच घ्या 'ही' काळजी

मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा केला जातो, बाप्पा आले की सर्वांच्याच आनंदाला पारावर उरत नाही. मात्र एकदा का गणेशोत्सव संपला सर्वजण काही घडलेच नाही अशा अविर्भावात आपल्या कामाला सुरुवात करतात.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

आज गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2019) शेवटचा दिवस, गेले 11 दिवस चालू असलेल्या या उत्सवाची सांगता आज गणपती विसर्जनाने (Ganpati Immersion) होत आहे. घरातील गणपती, सार्वजनिक गणपती अशा सर्व बाप्पांचे उद्या संध्याकाळपर्यंत विसर्जन होईल. मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा केला जातो, बाप्पा आले की सर्वांच्याच आनंदाला पारावर उरत नाही. मात्र एकदा का गणेशोत्सव संपला सर्वजण काही घडलेच नाही अशा अविर्भावात आपल्या कामाला सुरुवात करतात. विसर्जन मिरवणुकीनंतर शहराचे बदलेले रंगरूप दिसते, झालेला कचरा, प्रदूषण लक्षात येतो पण आपण इथे कुठे राहतो, याच्याशी आपल्याला काय घेणे देणे असा पवित्रा नागरिक घेतात.

मात्र यावेळी प्रत्येकानेच थोडीशी जबाबदारी उचलली तर फक्त प्रदूषण नाही तर अनेक गोष्टींना आळा बसू शकतो. शहर अगदी कमी वेळात पूर्वपदावर येऊन लोकांचेच जीवन सुकर होऊ शकते.