Ganesh Visarjan 2026 Images: अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा खास फोटोज!

अनंत चतुर्दशीला दोन परंपरा एकत्र येतात. पहिली म्हणजे विष्णूच्या अनंत रूपाची उपासना आणि अनंत व्रत. दुसरी म्हणजे गणेशोत्सवाचा समारोप आणि विसर्जन. अनेक ठिकाणी उत्सवाच्या धामधुमीत व्रताचा भाग मागे पडतो.

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी, 25 सप्टेंबर 2026 रोजी अनंत चतुर्दशीला होणार आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. याच दिवशी विष्णूच्या अनंत रूपाची पूजा आणि अनंत व्रतही केले जाते. "अनंत" म्हणजे अंत नसलेला. या दिवशी विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. शेषनागावर विसावलेला विष्णू हे अनंताचे रूप मानले जाते.

श्रद्धेनुसार गणेश भाद्रपद चतुर्थीला भक्तांच्या घरी येतात आणि अनंत चतुर्दशीला आपल्या धामी परततात. मातीच्या मूर्तीचे पाण्यात विलीन होणे हे निर्मिती आणि लयाच्या चक्राचे प्रतीक मानले जाते. अनेक भाविकांसाठी हा दिवस भावनिकही असतो. मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना WhatsApp Status, Facebook Messages, Wishes देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. Ganesh Visarjan Slogans 2026: पुढच्या वर्षी लवकर या!' बाप्पाला निरोप देताना दुमदुमणार ही लोकप्रिय विसर्जन घोषवाक्ये .

गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा

१. गणपती बाप्पा मोरया, निरोप तुझा प्रेमाचा, घराघरात राहो सुगंध तुझ्या आशीर्वादाचा. पुढल्या वर्षी पुन्हा ये आनंद घेऊन या, अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश विसर्जन 2026

२. दहा दिवसांचा सोहळा मनात जपून ठेवू, बाप्पाच्या आठवणींनी प्रत्येक क्षण सजवू. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या! अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश विसर्जन 2026

३. डोळ्यांत निरोप, मनात भेटीची आस, बाप्पा तुझ्यामुळे उजळला प्रत्येक श्वास. पुन्हा आनंदाचा उत्सव घेऊन लवकर या, अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश विसर्जन 2026

४. मोदकांचा गोडवा, आरतीचा सुंदर सूर, तुझ्या येण्याने भरला प्रत्येक घराचा उंबरठा भरपूर. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या! अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश विसर्जन 2026

५. निरोप आजचा, पण नातं कायमचं आहे, तुझ्या कृपेने प्रत्येक स्वप्न उजळत राहे. लवकर ये बाप्पा, पुन्हा आनंद फुलवायला या, अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश विसर्जन 2026

अनंत चतुर्दशीला दोन परंपरा एकत्र येतात. पहिली म्हणजे विष्णूच्या अनंत रूपाची उपासना आणि अनंत व्रत. दुसरी म्हणजे गणेशोत्सवाचा समारोप आणि विसर्जन. अनेक ठिकाणी उत्सवाच्या धामधुमीत व्रताचा भाग मागे पडतो.

गणेशपूजेची परंपरा महाराष्ट्रात पेशवेकाळात लोकप्रिय होती. त्या काळात उत्सव प्रामुख्याने घरगुती आणि राजघराण्यांशी संबंधित स्वरूपाचा होता. १८९३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यावर भर दिला. ब्रिटिश राजवटीत लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि राष्ट्रीय जागृतीसाठी हा उत्सव व्यासपीठ ठरला. तेव्हापासून सार्वजनिक गणेशोत्सव आणि सामूहिक विसर्जन मिरवणुका महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनल्या.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement