Ganesh Jayanti 2021 Rangoli Design: गणेश जयंती ला काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन  

यंदा हा गणेश जयंतीचा उत्सव सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 दिवशी साजरा केला जाणार आहे.

Photo Credit: YouTube

हिंदू पंचांगानुसार आणि पुराणकथांनुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती (Ganesh Jayanti) साजरी केली जाते. मान्यतांनुसार गणपती बाप्पाचा जन्म हा माघ महिन्यातील चतुर्थीला झाल्याने ही गणेश जयंती ही गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रासह भारतामध्ये गणेश जयंतीचा हा दिवस माघी गणेश चतुर्थी, माघी विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी अशा वेगवेगळ्या नावाने देखील ओळखली जाते. यंदा हा गणेश जयंतीचा उत्सव सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 दिवशी साजरा केला जाणार आहे. ( Anganewadi Jatra 2021: भराडी देवीची आंगणेवाडीची जत्रा यंदाच्या वर्षी भाविकांसाठी रद्द, उदय सामंत यांची माहिती )

आपल्याकडे कोणत्याही शुभ प्रसंगी आणि सणाच्या दिवशी देव घरासमोर, दारापुढे रांगोळी काढली जाते.अशा प्रसंगी रांगोळी काढणे शुभ मानले जाते.आज आपण गणेश जयंती ला काढता येतील अशाच काही  सोप्या आणि आकर्षक रंगोली डिझाइन पाहणार आहोत.

बड च्या सहाय्याने काढलेली विशेष रांगोळी 

फुलांची रांगोळी 

मल्टी कलर रांगोळी

पानांच्या आकारासारखी रांगोळी 

फोर्क च्या सहाय्याने काढलेली रांगोळी 

महाराष्ट्रात गणपतीच्या अष्टविनायकांसोबतच मुंबईतील सिद्धिविनायक गणपती सह अनेक गणेश मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहाने गणेश जयंती साजरी केली जाते. घरामध्ये गणेश जयंती साजरे करणारे अनेक भाविक यानिमित्ताने बाप्पाचे आवडते मोदक तीळ-गुळाच्या सारणामध्ये करतात. नैवेद्यामध्येही तीळाचा समावेश हमखास केला जातो.