Ganesh Chaturthi Invitation Card Format Marathi: गणेशोत्सवात गौरी-गणपतीच्या दर्शनाला मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages च्या माध्यमातून शेअर करा निमंत्रण पत्रिका

Ganpati Invitation Card Messages in Marathi 2023: यंदा या सेलिब्रेशनमध्ये तुमच्या मित्रमंडळांसोबत, घरातील नातेवाईकांना, सहकार्‍यांना आमंत्रित करण्यासाठी आकर्षक आमंत्रण पत्रिका बनवून निमंत्रित करण्यासाठी ही काही नमुना पत्रिका शेअर करून यंदाचं आमंत्रण अधिक आकर्षक बनवू शकता.

Ganpati | Representational image (Photo Credits: pixabay)

Ganpati Invitation Card Messages in Marathi 2023: गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरात पूजा, साफसफाई, मखराची सजावट याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणपती आणि गौराईचं आगमन येत्या काही दिवसांत होणार आहे. मग बाप्पाचं आगमन झाल्यानंतर तुम्हांला त्यांच्या दर्शनासाठी तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना तुमच्या घरी आमंत्रित करून सणाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका, त्यासाठी गणेशोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकांचे फॉर्मेट शेअर करू शकता.

घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचं आगमन 19 सप्टेंबर दिवशी होणार आहे. घरात किमान दीड, पाच, सात, दहा दिवसांचा असतो. तर सार्वजनिक गणेशोत्सव 19-29 सप्टेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. तर गणपती पाठोपाठ गौराईचं आगमन 21 सप्टेंबरला होणार आहे आणि 22 सप्टेंबरला तिचं पूजन होणार आहे. Ganpati Decoration Ideas 2023: गणपती डेकोरेशन, घरगुती पद्धतीने करा बाप्पाची आरास 

गौरी-गणपती दर्शन आमंत्रण पत्रिका

Ganpati-invitation | File Image

*आग्रहाचे आमंत्रण*

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 19 सप्टेंबर दिवशी आमच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे, तरी आपण सर्वांनी सहकुटूंब व सहपरिवार

आणि मित्र मंडळीसह येऊन माझ्या विनंतीस मान देऊन,

लाडक्या बाप्पाचे दर्शनास नक्की या!

घरचा पत्ता :-

--------------------

|| श्री गणेशाय नम: ||

दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे

19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023

दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे

तरी आपण सर्वांनी सहकुटुंब - सहपरिवार

गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे

असे आग्रहाचे आमंत्रण

|| गणपती बाप्पा मोरया ||

घरचा पत्ता :-

--------------------

आग्रहाचे आमंत्रण

आमच्या येथे सालाबादप्रमाणे यंदाही

गौरी - गणपतीचे आगमन होणार आहे

तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार

येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा

-------------------

(हे देखील नक्की वाचा: गणेशोत्सवात प्रियजणांना घरी आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून शेअर करा या 'निमंत्रण पत्रिका')

आजकाल डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा बोलबाला असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून आकर्षक आमंत्रण पत्रिका शेअर करून तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाचं आमंत्रण बनवू शकता.   मग यंदा या सेलिब्रेशनमध्ये तुमच्या मित्रमंडळांसोबत, घरातील नातेवाईकांना, सहकार्‍यांना आमंत्रित करण्यासाठी आकर्षक आमंत्रण पत्रिका बनवून निमंत्रित करण्यासाठी ही काही नमुना पत्रिका शेअर करून यंदाचं आमंत्रण अधिक आकर्षक बनवू शकता.