Ganpati Invitation Card Messages in Marathi: गणेशोत्सवात प्रियजणांना घरी आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून शेअर करा या 'निमंत्रण पत्रिका'

ऋषिपंचमीनंतर महाराष्ट्रात गौराईंचं देखील आगमन होते. त्यामुळे तुमच्या घरातील कार्यक्रमांप्रमाणे गणेशोत्सव आमंत्रणाचा नमुना ऑनलाईन शेअर करून आप्तांना द्या यंदा घरी बाप्पाच्या दर्शनाला यायचं आमंत्रण!

गणपती आमंत्रण। File Image

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला यंदा गणरायचं आगमन होणार आहे. मागील 2 वर्ष कोरोना संकटामुळे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला होता. पण यंदा हे संकट आटोक्यात आल्याचं चित्र असल्याने पुन्हा धामधूम सुरू झाली आहे. गणेशभक्तांची बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू झाली आहे. मखर सजावट ते पूजेचे साहित्य याची जमवाजमव, साफसफाई एकीकडे सुरू असताना दुसरीकडे पूर्वीप्रमाणे नातलगांकडे जाऊन थेट भेट घेऊन बाप्पाचं दर्शन घेता येणार असल्याने आमंत्रण-निमंत्रण पत्रिका देण्यास सुरूवात झाली आहे. 31 ऑगस्ट दिवशी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) सर्वत्र गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आजकाल सोशल मीडीयाचा बोलबाला आहे त्यामुळे गणेशोत्सवाचं आमंत्रण WhatsApp Messages द्वारा देणं सुकर आहे. मग आमंत्रण पत्रिकेचा नमुना मजकूर पाहून तुम्ही तो तुमच्या सोयीप्रमाणे तारीख, वेळ, पत्ता घालून शेअर करू शकता. (हे देखील नक्की वाचा: Ganesh Chaturthi Invitation Card Format Marathi: गणेशोत्सवात गौरी-गणपतीच्या दर्शनाला मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages च्या माध्यमातून शेअर करा निमंत्रण पत्रिका)

सामान्यपणे किमान दीड दिवस ते दहा दिवसांचा गणपती घरी विराजमान करण्याची पद्धत आहे. ऋषिपंचमीनंतर महाराष्ट्रात गौराईंचं देखील आगमन होते. त्यामुळे तुमच्या घरातील कार्यक्रमांप्रमाणे गणेशोत्सव आमंत्रणाचा नमुना ऑनलाईन शेअर करून तुम्ही या सणामध्ये आता प्रियजण, नातेवाईक, मित्रमंडळींना सहभागी करून घेऊ शकता.

गणेशोत्सव 2022 आमंत्रण पत्रिका

आमंत्रण नमुना 1:

ॐ श्री गणेशाय नम:॥

आमच्या घरी यंदा 31 ऑगस्ट दिवशी गणरायाचं आगमन होणार आहे. या निमित्त होणार्‍या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री आणि सौ ... कङून आग्रहाचे निमंत्रण!

पत्ता—

तारीख,वेळ

31 ऑगस्ट दिवशी  सकाळी 9 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा

गणपती आमंत्रण। File Image

आमंत्रण नमुना 2:

*llश्री* *गणेशाय* *नम:ll*

सालाबादा प्रमाणे यंदाही गणपती बाप्पा सोबत गौराईचं वास्तव्य आमच्या घरी दि. 31-8-2022 ते 5-9-2022 पर्यंत आहे. तरी या मंगल प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन  घेण्यासाठी  यावे ही नम्र विनंती.

पत्ता:

*आम्ही आपली वाट पाहत आहोत*

---------------------------------------------

आमंत्रण नमुना 3:

नमस्कार,

सालाबात प्रमाणे यंदाही आमच्या घरी दिनांक 31/8/2022 रोजी  लाडक्या गणरायाचे दीड दिवसांसाठी  आगमन होणार आहे. त्या निमित्त सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे.तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा पूजेचे लाभ घ्यावा.

आपले नम्र

पत्ता-

गणपती आमंत्रण। File Image

(हे देखील नक्की वाचा: Ganeshotsav 2022: गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर मुंबई महापालिकेकडून विशेष सूचना जारी, गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक) .

मागील दोन वर्ष गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने आणि पर्यावरकपूरक पद्धतीने मोठ्या स्वरूपात साजरा झाला आहे. यंदा कोरोना निर्बंध नसले तरीही मागील दोन वर्षांमधून आपण कळत नकळत स्वीकारलेल्या सवयी आणि सामाजिक भान राखत बाप्पाचं स्वागत आणि विसर्जन करा.