Ganesh Chaturthi 2021 Messages: गणेश चतुर्थी निमित्त खास मराठी WhatsApp Status, Wishes, Images, Quotes शेअर करून द्या या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा
Ganesh Chaturthi Messages in Marathi: टिळकांच्या प्रयत्नापूर्वी गणेश उपासना कुटुंबापुरती मर्यादित होती, मात्र त्यांनी या उपासनेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित ठेवले नाही, तर स्वातंत्र्यासाठी लढण्याचे, अस्पृश्यता दूर करण्याचे, समाज संघटित करण्याचे आणि सामान्य माणसाचे प्रबोधन करण्याचे साधनही बनवले.
Ganesh Chaturthi Wishes in Marathi: बुद्धी, संपत्ती, सौभाग्य, प्रदान करणाऱ्या आणि सर्व संकटांचा नाश करणाऱ्या भगवान गणेशाचे खास पर्व 'गणेशोत्सव 2021' (Ganeshotsav 2021), अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. हा 10 दिवसांचा उत्सव भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीपासून (Ganesh Chaturthi 2021) सुरू होऊन अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. गणेशोत्सव अवघ्या भारतामध्ये साजरा होतो, मात्र महाराष्ट्रामध्ये त्याची मोठी धूमधाम पहायला मिळते. या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबांमध्ये गणपतीची मूर्ती बसवून तिची दहा दिवस मनोभावे पूजा केली जाते. यावर्षी 10 सप्टेंबर रोजी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होईल
हिंदू धर्मात शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने होते. असे मानले जाते की, गणेशाच्या पूजेमुळे सुरू केलेले काम निर्विघ्नपणे पार पडते. गणपतीला आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. आता तर 10 दिवस बाप्पा घरात विराजमान असणार आहेत, ज्याची सुरुवात गणेश चतुर्थीपासून होत आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत खास मराठी WhatsApp Messages, SMS, Wishes, Messages, Quotes, Images, जी शेअर करून तुम्ही गणेशभक्तांना देऊ शकता या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा.
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो,
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!
दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रकूट, चालुक्य, सात वाहनाच्या काळातही गणेशोत्सव होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही गणेशाची पूजा केली होती. पुढे पेशव्यांनी गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले. पण लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणोशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन बाप्पांना राष्ट्रीय एकतेचे प्रतीक बनवले.
टिळकांच्या प्रयत्नापूर्वी गणेश उपासना कुटुंबापुरती मर्यादित होती, मात्र त्यांनी या उपासनेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित ठेवले नाही, तर स्वातंत्र्यासाठी लढण्याचे, अस्पृश्यता दूर करण्याचे, समाज संघटित करण्याचे आणि सामान्य माणसाचे प्रबोधन करण्याचे साधनही बनवले.