IPL Auction 2025 Live

Ganesh Chaturthi Songs 2020: गणेश चतुर्थी निमित्त 'या' काही खास गाण्यांच्या माध्यमातून साजरा करा गणेशोत्सवाचा सण!

Image For Representation (Photo Credits-Facebook)

Ganesh Chaturthi Songs 2020: गणेशोत्सोवाचा सण म्हटला की सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येते. घरात गणपती बाप्पाचे आगमन होणार म्हणून लहान मुलांपासून ते वयोवृद्धांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरेच काही सांगून जातात. गणेशोत्सवाचा सण हा गणेश भक्तांसाठी खुप महत्वाचा मानला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. यंदा गणेश चतुर्थी 22 ऑगस्टला आली असून या दिवशी गणपतीची विशेष पूजा-अर्चना केली जाते तसेच गणूबाप्पाचे आपल्या घरी आगमन होते.(Ganesha Whatsapp Stickers Download: गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा देण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्स वापरुन डाउनलोड करा बाप्पाचे व्हॉटसअ‍ॅप स्टिकर्स)

गणेश चतुर्थीचा सण हा सुख-समृद्धीचा असल्याचे मानले जाते. गणपतीची 108 विविध नावे असून प्रत्येक नावापाठी एक विशेष कथा सुद्धा आहे. मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मोठी धुम दिसून येणार नाही आहे. नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घरच्या घरीच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण तुम्ही नाराज होऊ नका कारण गणेश चतुर्थी निमित्त 'या' काही खास गाण्यांच्या माध्यमातून साजरा करा गणेशोत्सवाचा सण!(Ganpati Invitation Marathi Messages Format: बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनासाठी यंदा WhatsApp Messages,Images द्वारा पाहुण्यांना करा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत आमंत्रित)

>>अधिपती मोरया

>>हे लंबोदर

>>सुरु निरागस हो

>>मोरया 

>>बाप्पा 

>>मोरया रे 

>>या रे या

>>देवा श्री गणेशा

>>श्री सिद्धिविनायक मंत्र आणि आरती 

तर घरगुती गणेशोत्सवाप्रमाणे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची देखील मोठी परंपरा आहे. गणेशोत्सव काळात लोकांनी एकत्र यावं, स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधनासाठी सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. आज 21 व्या शतकात आता सार्वजनिक गणेशोत्सवाचेही स्वरूप बदलले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे बहुतांश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणासह आरोग्य संबंधित उपक्रम राबण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत महापालिकेने नागरिकांना शक्य असल्यास कृत्रिम तलावात गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहन ही केले आहे.