Ganesh Chaturthi 2020: मास्क च्या मखरात बाप्पा विराजमान, बदलापुर येथील भोईर कुटुंंबाची अनोखी कल्पना (Photos Inside)
आज गणेश चतुर्थी च्या निमित्त या खास ईको फ्रेंडली आणि जनजागृती करणार्या कलाकृतीविषयी जाणुन घेउयात.
आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी ला देशविदेशात बाप्पांंचे आगमन झाले आहे. यंंदा खरतंंर कोरोनामुळे (Coronavirus) गणेशोत्सवावर (Ganeshotsav) आलेलं संंकट पाहता अनेकांंची निराशा झाली आहे मात्र बदलापुर च्या भोईर कुटुंंबाने याच दोन्ही गोष्टींंची सांगड घालत आपल्या घरच्या गणरायासाठी एक सुंंदर सजावट केली आहे. कोरोना पासुन वाचायचे असेल तर सर्वात महत्वाची अशी बाब म्हणजे खबरदारी. मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे इतक्या साध्या उपायांनी आपण स्वतःला सुरक्षित ठेवु शकता, अगदी सुरुवातीपासुन या सुचना आपण सर्वांनी ऐकल्या आहेत, पाळतही आहोत. हीच बाब बाप्पांच्या माध्यमातुन सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी भोईर कुटुंंबानी यंंदा आपल्या बाप्पाला चक्क मास्कच्या मखरात (Mask Makhar) विराजमान केले आहे. आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2020)च्या निमित्त या खास ईको फ्रेंडली आणि जनजागृती करणार्या कलाकृतीविषयी जाणुन घेउयात. चला तर मग..
गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा देणारे मराठी Messages, Whatsapp Status वर शेअर करत साजरा करुयात गणेशोत्सव
बदलापुर येथे राहणार्या जनार्दन भोईर यांच्या घरच्या बाप्पासाठी हे मास्कचे मखर साकारण्यात आले आहे. बिपीन सांंटे आणि सोमेश भोईर या दोघांनी मिळुन हे मखर साकारले आहे. यासाठी तब्बल 500 हुन अधिक मास्क वापरले आहेत.या खास मखरासाठी गणेशोत्सवाच्या अवघ्या पाच दिवस आधी तयारी सुरु करण्यात आली होती.
मास्कचे मखर
अवघ्या पाच दिवसांच्या अवधीत या हटके कल्पनेला पुर्ण करत आज यथासांग पुजा व प्राणप्रतिष्ठापना करुन बाप्पाला मखरात बसवण्यात आले आहे.
मास्कच्या मखरात बाप्पा
दरम्यान, कोरोनाच्या संंकटामुळे सार्वजनिक स्तरावर गणेशोत्सव साधेपणाने केला जाणार असला तरी घरगुती गणपती उत्सवाचा उत्साह मात्र कायम आहे.तुम्हीही अशा काही हटक्या कल्पना साकारल्या असतील तर त्याचे फोटो आम्हाला आवर्जुन पाठवा यासाठी LatestLY Marathi या फेसबुक व ट्विटर अकाउंटला भेट देऊ शकता.