IPL Auction 2025 Live

Gajanan Maharaj Prakat Din 2021 Images: गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा संदेश, Wallpapers, Greetings शेअर करुन दिवस करा मंगलमय!

माघ वद्य सप्तमी दिवशी बुलढाणा येथील शेगाव येथे हाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले.

Gajanan Maharaj Prakat Din 2021 | File Image

Gajanan Maharaj Prakat Din 2021 HD Images: शेगावचे गजानन महाराज यांचा उद्या शुक्रवार, 5 मार्च रोजी प्रकट दिन आहे. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र 23 फेब्रुवारी 1878 मध्ये त्यांचे प्रथम दर्शन झाले. त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. बुलढाणा मधील शेगाव येथे महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून माघ वद्य सप्तमी दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात मोठा उत्सव असतो. चरण पादुका पूजन, पालखी असे विधी पार पडतात. यानिमित्ताने देशभरातून लाखो भक्त मंदिरात दर्शनासाठी येतात. शेगाव प्रमाणे इतर ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठातही भव्य उत्सव आयोजित केले जातात.

'गण गण गणात बोते' या महाराजांचा आवडता मंत्र. ते या मंत्राचा अखंड जप करत असतं. यामुळेच त्यांना 'गजानन महाराज' असे नाव पडले. 'शेगावीचे संत' म्हणूनही त्यांची ओळख आहे. (Gajanan Maharaj Temple: गजानन महाराज प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला औरंगाबादच्या गारखेडा येथील मंदिर पुढील सात दिवस बंद)

दरम्यान, गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Wallpapers, Greetings तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) वरुन शेअर करुन भाविकांचा दिवस मंगलमय करु शकता.

गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा!

Gajanan Maharaj Prakat Din 2021 | File Image
Gajanan Maharaj Prakat Din 2021 | File Image
Gajanan Maharaj Prakat Din 2021 | File Image
Gajanan Maharaj Prakat Din 2021 | File Image
Gajanan Maharaj Prakat Din 2021 | File Image

गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. पालखी माध्यमातून गजानन महाराज अगदी खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचले. दरम्यान, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावीच समाधी घेतली. ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहचल्यावर त्यांनी प्राण अनंतात विलन केले.