Vivah Muhurat 2024: लग्नसराई कधी सुरू होणार? नोव्हेंबर 2024 ते जून 2025 पर्यंत 'हे' आहेत लग्नासाठी शुभ मुहूर्त

2025 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत लग्नासाठी शुभ मुहूर्त कधी आहेत ते जाणून घेऊयात...

Vivah Muhurat 2024 (फोटो सौजन्य - File Image)

Vivah Muhurat 2024: नवीन वर्ष 2025 लवकरच सुरू होणार आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी असतो. नवीन वर्षाच्या प्रारंभासह, लोक येत्या काही महिन्यांत शुभ मुहूर्तावर विवाह आणि इतर शुभ कार्ये करतात. हिंदू धर्मातील सर्व 16 संस्कारांपैकी विवाह हा सर्वात महत्त्वाचा संस्कार मानला जातो. वैदिक ज्योतिषात कोणतेही शुभ कार्य करताना शुभ मुहूर्ताचा विचार केला जातो.

शुभ काळात केलेले शुभ कार्य यशस्वी आणि चांगले मानले जाते. दुसरीकडे शुभ कार्यात शुभ मुहूर्ताचा विचार केला नाही तर कामात विविध प्रकारचे अडथळे निर्माण होतात, असं म्हटलं जातं. वैदिक शास्त्रामध्ये विवाह हे पवित्र नाते मानले गेले आहे. लग्नासारखे शुभ कार्य नेहमी शुभ मुहूर्तावर करणे आवश्यक आहे. लग्नात कुंडली जुळण्यावर आणि लग्नाच्या शुभ तारखांवर विशेष लक्ष दिले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार 2025 मध्ये लग्नासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. 2025 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत लग्नासाठी शुभ मुहूर्त कधी आहेत ते जाणून घेऊयात...

जानेवारी महिन्यात लग्नासाठी 10 शुभ दिवस -

फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी 14 शुभ दिवस -

मार्च महिन्यात लग्नासाठी 5 शुभ दिवस -

एप्रिलमध्ये लग्नासाठी 10 दिवसांचा शुभ मुहूर्त -

मे महिन्यात लग्नासाठी 15 शुभ दिवस -

जूनमध्ये लग्नासाठी 5 शुभ दिवस -

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त नाहीत.

नोव्हेंबरमध्ये लग्नासाठी 14 शुभ दिवस आहेत.

डिसेंबरमध्ये लग्नासाठी 3 शुभ दिवस असतील.

हिंदू कॅलेंडरनुसार वर्षातील काही महिने लग्नासाठी खूप चांगले मानले जातात तर काही महिने निषिद्ध मानले जातात. जेव्हा वधू आणि वराच्या बाजूने लग्न निश्चित केले जाते, तेव्हा दोन्ही कुटुंबातील सदस्य लग्नासाठी योग्य मुहूर्त आणि वेळ शोधतात.