Friendship Day 2020 Date: यंदा 2 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार फ्रेंडशिप डे!

त्यामुळे यंदा फ्रेंडशिप डे 2 ऑगस्ट दिवशी आहे.

फ्रेंडशिप डे 2020 (Photo Credits: File Image)

जगभरात सध्या कोरोना संकटामध्ये अडकलेल्या अनेकांना एका शहरामध्ये राहून देखील आपल्या जवळच्या मित्रांना भेटता येत नाही. त्यांच्यासोबत नेहमीसारखी मज्जा मस्ती करता येत नाही. मात्र येत्या काही दिवसांतच तुम्हांला एकदा नाही तर दोनदा तुमच्या फ्रेंडशिप मधील कडू-गोडआठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे. 31 जुलै हा इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे (International Friendship Day) आहे. तर ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे (Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे यंदा फ्रेंडशिप डे 2 ऑगस्ट दिवशी आहे.

फ्रेंडशिप डे साजरा करण्याला सुरूवात मूळात ग्रिटिंग कार्ड इंडस्ट्रीमधून झाली. 1958 साली पेरूग्वे कडून या दिवसाचं सेलिब्रेशन सुरू करण्याचा विचार पुढे आला आणि हळूहळू रूजला. यामध्ये काही जण मित्र-मैत्रिणींच्या हातावर फ्रेंडशिप बॅन्ड बांधतात तर काही ग्रीटिंग्स, मेसेज, गिफ्ट्स, चॉकलेट्स एकमेकांना देऊन हा सण साजरा करतात. मात्र यंदा कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर आता व्हर्च्युअली तो साजरा करावा लागणार आहे.

फ्रेंडशिप डे साजरा करण्याला असा खास इतिहास नाही. त्याच्याबद्दल सामान्यांमध्ये कुतुहल खूप आहे. पण तरूणाई या दिवशी मित्र-मैत्रिणींना भेटते. त्यांना फ्रेंडशिपच्या डेच्या शुभेच्छा देते. कॉलेजच्या कट्टावर यादिवशी धमाल मस्ती करताना अनेक मंडळी दिसतात. यानिमित्ताने सारे पुन्हा एकत्र येतात आणि त्यांच्यामधील मैत्रीची बॉन्ड अधिक घट्ट करतात.