Friendship Day 2020 Quotes: फ्रेंडशिप डे दिवशी शाळेतील मित्रांना Facebook, WhatsApp च्या माध्यमातून Messages,Wishes, GIFs शेअर करून उजाळा द्या जुन्या आठवणींना!
आज फ्रेंडशिप डे दिवशी जगाच्या विविध भागात राहणार्या तुमच्या शालेय जीवनातील मित्रांना फेसबूक, व्हॉट्सअॅपच्या मध्यमातून शुभेच्छा देऊन आजचा फ्रेंडशिप डे साजरा करा.
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्ही वेगवेगळे मित्र- मैत्रिण जोडले असतील. पण आयुष्यात शाळेच्या दिवसांत झालेले मित्र खास असतील. आयुष्यातील 8-10 वर्ष तुम्ही सातत्याने एकमेकांसोबत असल्याने तुमच्यामधील बॉन्डिग देखील खास असेल. पण आज फ्रेंडशिप डेचं औचित्य साधत तुमच्यातील हेच खास जपण्यासाठी, त्यामधील जिव्हाळा टिकवण्यासाठी आणि मैत्री अधिक घट्ट करण्यासाठी आज फ्रेंडशिप डे दिवशी जगाच्या विविध भागात राहणार्या तुमच्या शालेय जीवनातील मित्रांना फेसबूक, व्हॉट्सअॅपच्या मध्यमातून शुभेच्छा देऊन आजचा फ्रेंडशिप डे साजरा करा.
भारतामध्ये ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. यामागे कोणताही ठराविक इतिहास नाही परंतू ग्रीटिंग कार्ड इंडस्ट्रीकडून या दिवसाचं सेलिब्रेशन मार्केटिंग स्ट्रॅटेजीमधून एक मोठा इव्हेंट बनली आहे. मैत्री दिन या एका दिवसावर त्याचं सेलिब्रेशन अवलंबून नसतं तर आयुष्याच्या चढ- उतारावर तुम्ही एकमेकांना दिलेली साथ मैत्री टिकवण्यासाठी मदत करते. मग याआधी तुम्हांला कधी कठीण प्रसंगामधून बाहेर काढण्यासाठी ज्या मित्राने, मैत्रिणीने साथ दिली असेल तिच्यासाठी आजचा दिवस खास बनवण्याकरिता हॅप्पी फ्रेंडशिप डे ची ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, मेसेज देऊन जुन्या आठवणींना उजाळा द्या.
शाळेतील मित्रांना फ्रेंडशिप डे 2020 च्या शुभेच्छा!
'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असं ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.'- पु. ल. देशपांडे
जो टिका करतो. परंतु मैत्री तुटण्याच्या भीतीने सावध राहतो, तो मित्र नाही. - गौतम बुद्ध
व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप जगभरात वापरलं जातं. आता त्यामध्ये सणांच्या, इव्हेंट्सच्या काळानुसार शुभेच्छा देणारी नवनवीन स्टिकर्स पॅक अपडेट केली जातात. दरम्यान आज या फ्रेंडशीप डे चा आनंद द्विगुणित करायचा असेल तर हॅप्पि फ्रेंडशीप डे शुभेच्छा देणारी कस्टमाइज्ड व्हॉट्सअॅप स्टिकर्स बनवून देखील तुम्ही मित्रांना आजच्या मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.