Father's Day 2020 Funny Memes and Jokes: फादर्स डे च्या निमित्त सोशल मीडिया वर हे फनी मीम्स व्हायरल; पहा आणि सांगा तुमचे वडील पण असेच आहेत का?
या सवयी मजेशीर पद्धतीने मांडत हल्ली सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.
बाबा, डॅड, अब्बू, वेगवेगळ्या नावाने जरी हाक मारली जात असली तरी भारतातील सर्व वडिलांच्या काही खास सवयी मात्र कॉमन आहेत. लाईट फॅनची बटणं बंद करण्यापासून ते घरी येण्याच्या वेळेपर्यंत वडिलांचे नियम तुम्ही आम्ही सर्वांनीच अनुभवले आहेत. या सवयी मजेशीर पद्धतीने मांडत हल्ली सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत असतात. येत्या रविवारी म्हणजेच 21 जून रोजी फादर्स डे (Father's Day) आहे. या निमित्ताने हे मिम्स एकत्र करून या लेखात आपण पाहणार आहोत. जर का तुम्हाला यंदा तुमच्या वडिलांना फादर्स डे निमित खास अंदाजात शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यांना हे मिम्स पाठवण्याचा विचार करू शकता. तत्पूर्वी गंमत म्हणून तुम्हीच तपासून पहा की तुमचेही बाबा असेच आहेत का?
Father's Day 2020 Funny Memes
1)
2)
3)
4)
5)
6)
7)
8)
दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अनेक देशात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. फादर्स डे सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी वॉशिंग्टनमध्ये साजरा केला गेला होता. सोनेरा डोड यांनी आपला सांभाळ करणाऱ्या वडिलांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती, पुढे भारतातही हा दिवस स्वीकारून साजरा केला जाऊ लागला. या खास दिवसाच्या तुम्हाला सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा, हॅप्पी फादर्स डे!