Engineer's Day 2022: APJ Abdul Kalam, E Sreedharan ते Sundar Pichai भारताच्या 'या' अव्वल इंजिनियर्सचा असावा सार्थ अभिमान!

Mokshagundam Visvesvaraya यांच्या जयंती निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो.

Happy Engineer's Day (File Image)

भारतामध्ये 15 सप्टेंबर हा दिवस Engineer's Day अर्थात अभियंता दिवस म्हणून साजरा करतात. Mokshagundam Visvesvaraya यांच्या जयंती निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. Mokshagundam Visvesvaraya यांना भारतात अभियंता क्षेत्राचा पाया रचल्याचं म्हटलं जातं. भारतरत्न Mokshagundam Visvesvaraya यांना "Father of Modern Mysore" म्हणूनही ओळखलं जातं.

दरम्यान आज भारतात शिक्षण घेऊन अनेक इंजिनियर्स देशा-परदेशात काम करत आहेत. बदलत्या काळानुसार, तंत्रज्ञानामध्ये बदल करून विकासाला गती देण्याचं काम इंजिनियर्स करत असतात. मग या कामात जगभर आपल्या कामाची दखल घेण्यास भाग पाडणार्‍या 'या' काही भारतीय अभियंतांचा आपल्याला नक्कीच अभिमान असायला हवा. हे देखील नक्की वाचा:  जाणून घ्या जगभरात कोणत्या देशात किती तारखेला साजरा करतात अभियंता दिन?

Verghese Kurien - मिल्कमॅन ऑफ इंडिया

भारतीय दुग्धक्रांतीचे जनक म्हणून ओळख असलेले वर्गीस कुरियन हे भारतीय उद्योजक आणि अभियंते होते. नेस्ले इंडियाला टक्कर देत त्यांनी म्हशीच्या दूधाची भूकटी बनवण्याचा प्रयत्न यशस्वी करत त्यापासून अनेक दूग्धजन्य प्रोडक्ट्स बनवले. भारतात त्यांनी "आनंद" किंवा डेअरी सहकारी संस्थांचे अमूल मॉडेल सुरू करून देशाला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवले.

Satish Dhawan - इंडियन किंग ऑफ कम्युनिकेशन

सतीश धवन यांची ओळख fluid dynamics संशोधनाचे जनक म्हणून होते. Mechanical Engineering ची पदवी घेतल्यानंतर ते कॅलिफॉर्नियामध्ये aeronautical engineering शिकण्यास गेले. पुढे aerospace engineering आणि गणिता मध्ये त्यांनी पीएचडी केली. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT, IRS आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला.

Dr APJ Abdul Kalam - मिसाईल मॅन ऑफ इंडिया

भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून ओळख असलेले एपीजे अब्दुल कलाम यांची ओळख भारताचे मिसाईल मॅन अशी आहे. ते Madras Institute of Technology मध्ये शिकले आणि नंतर DRDO मध्ये सायंटिस्ट म्हणून कामाला लागले. Pokhran-II nuclear tests मध्ये त्यांचं मोलाचं काम होते. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे त्यांची ओळखच बदलली.

E. Sreedharan - मेट्रोमॅन ऑफ इंडिया

ई श्रीधरन हे भारतातील प्रख्यात सिव्हिल इंजिनियर आहेत. ई श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणूनही ओळखले जाते. 1995 ते 2012 या काळात ते दिल्ली मेट्रोचे संचालक होते. भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. ते भारतीय अभियांत्रिकी सेवेतून निवृत्त अभियंता होते. त्यांनी आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले.

Sundar Pichai - गूगल सीईओ 

2004 साली गूगल मध्ये कामाला लागलेले सुंदर पिचाई आज गूगलचे सीईओ आहेत. त्यांचा जन्म तामिळनाडू मधील मदुराई मधील आहे. अमेरिकेच्या Stanford मध्ये त्यांनी Material Sciences and Engineering चे शिक्षण घेतले. जगातील सार्‍या लॅपटॉप्समध्ये Google Chrome हे standard internet browser करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. Google Drive देखील यशस्वी क्लाऊड प्लॅटफॉर्म करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

प्रत्येक देशात त्यांच्या अभियंतांच्या कार्याला सलाम करण्यासाठी एक वेगवेगळ्या दिवशी सेलिब्रेशन असते. UNESCO कडून World Engineer's Day 4 मार्चला साजरा केला जातो. पण भारतात हा 15 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो.