लखऊमध्येही चंद्र दिसला नाही. त्यामळे 14 मे रोजी ईद साजरी केली जाईल असे मौलाना आसमान यांनी म्हटले आहे.
Eid Moon Sighting 2021 Live News Updates: लखनऊमध्येही चंद्र दिसला नाही, 14 मे रोजी साजरी होणार ईद
इस्लाम धर्मात अत्यंत उत्साहाचा समजला जाणारा उत्सव ईद-उल-फितर (Eid al-Fitr 2021) चंद्र दिसल्याच्या दुसऱ्या दिवसापासून साजरा केला जातो. मुस्लिम बांधव अत्यंत उत्साहाने आणि धुमधडाक्यात साजरा करतात. हे पर्व रमजान नंतर शव्वालच्या पहिल्या तारखेस साजरे केले जाते. सकाळ नमाजने सुरु होते. यंदा भारतात ईद 14 मे या दिवशी साजरी होईल असे अपेक्षीत आहे. कारण ईदचा चांद 13 मे या दिवशी दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. रमजानच्या ( (Ramadan Eid 2021) उपवासाचा आज 29 वा दिवस आहे. गेले एक महिनाभर रमजानचा उपावस ईद-उल-फितर सोबत संपतो. हा दिवस जगभरातील इस्लाम धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. रमजानच्या शेवटच्या दिवशी चांद दिसताच ईदची तारीख दिसते. आतापर्यंत भारतात भारतात ईदचा चांद पाहायला मिळाला नाही. दिल्ली येथील फतेहपूरी मशिदिचे शाही इमाम डॉ. मुफ्ती मोहम्मद मुकर्रम अहमद यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, ईद उल फितर 14 मे रोजी साजरी केली जाईल. इस्लमा धर्मानुसार हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो. ईदच्या चंद्रदर्शनाचे अपडेट इथे पाहा. (Eid Moon Sighting 2021 Live News Updates)
ईदचा उत्सव हा नेहमीच चंद्रदर्शनावर अवलंबून असतो. त्यामुळे चंद्र दिसणे अत्यंत महत्त्वाचे असते. चंद्र दर्शन होताच हा उत्सव साजरा होण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते. 11 मे या दिवशी सौदी अरबसह आखाती देशात चंद्रदर्शनासाठी वाट पाहीली गेली. परंतू, यंदा चंद्रदर्शन घडले नाही. केरळमध्येही मंगळवारी चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे अपेक्षा व्यक्त करण्या येत आहे की, आज तरी चंद्र दर्शन होऊ शकेल. जर 12 मे या दिवशी चंद्रदर्शन झाले तर भारतात 13 मे रोजी भारतात ईद मोठ्या उत्साहात साजरी होईल. जर 13 मे या दिवशीही चंद्रदर्शन घडले नाही तर मग ईद 14 मे या दिवशी साजरी होईल. (हेही वाचा, Eid al-Fitr 2021 In Guidelines Maharashtra: कोरोना काळात इद उल फित्र बाबत महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी)
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी व संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. यावर्षी दि. 13 एप्रिलपासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला असून दि. 13 किंवा 14 मे 2021 (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता शासनाच्या दि. 13 एप्रिल, 2021च्या आदेशामधील तरतुदींच्या अधिन राहून विशेष खबरदारी घेत इद उल फित्र (Eid al-Fitr 2021) साजरी करणे आवश्यक आहे त्यानुसार रमजान ईदच्या निमित्ताने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना (Ramadan Eid Guidelines) देण्यात आल्या आहेत
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)