Eid Milad-Un-Nabi 2020 Date: भारतामध्ये यंदा ईद - ए- मिलाद कधी? मुस्लिम बांधवांसाठी या दिवसाचं काय महत्त्व?

ईद- ए- मिलाद ही इस्लामिक कॅलेंडर प्रमाणे रवि-उल-अव्वल या तिसर्‍या महिन्याच्या 12 व्या दिवशी साजरी केली जाते.

Eid e Milad un Nabi Mubarak WhatsApp DP And Wallpaper (Photo Credits: File Image)

Mawlid 2020 Date In India:  मुस्लिम धर्मातील प्रामुख्याने सुफी पंथीय प्रेषित मुहंमद पैगंंबर यांचा जन्म दिवस (Prophet Mohammed's Birthday Celebrations) हा ईद - ए- मिलाद म्हणून साजरा करतात. हा दिवस ईद- ए- मिलाद सोबतच ईद मिलाद उन-नबी (Eid Milad-Un-Nabi) किंवा मावलिद (Mawlid) म्हणून देखील ओळखला जातो. मुस्लिम धर्मियांच्या इतर काही संप्रदायांच्या मते या धर्मामध्ये  बर्थ डे सेलिब्रेशनची प्रथा नाही. मात्र भारतामध्ये ईद - ए- मिलाद हा दिवस पैगंबरांचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे.

मावलिदचा अर्थ 'जन्म' असा होता. तर मिलाद उन-नबी म्हणजे 'हजरत मुहंमद साहेब' यांचा जन्मदिन असा होतो.

यंदा भारतामध्ये मिलाद उन-नबी /ईद- ए- मिलाद 2020 कधी आहे?

ईद- ए- मिलाद ही इस्लामिक कॅलेंडर प्रमाणे रवि-उल-अव्वल या तिसर्‍या महिन्याच्या 12 व्या दिवशी साजरी केली जाते. भारतामध्ये रवि-उल-अव्वल हा महिना ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार, 19 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्यामुळे ईद मिलाद उन नबी किंवा मावलिद 30 ऑक्टोबर दिवशी आहे.

काही मशिदींमध्ये या ईद- ए- मिलाद च्या निमित्ताने संपूर्ण रवि-उल-अव्वल या महिन्यामध्ये विशेष प्रार्थना केली जाते. त्यानिमित्त मुस्लिम बांधव एकत्र जमतात. मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचं स्मरण करतात. तर काही ठिकाणी यानिमित्ताने भव्य मिरवणूका निघतात. घरामध्येच नमाज अदा करून खास मेजवानीचा बेत असतो. यंदा कोविड 19 मुळे सणांचं स्वरूप बदललेलं आहे. या सणाच्या निमित्ताने घरच्या घरी नमाज अदा करण्याचं तसेच भव्य मिरवणूका टाळण्याचं आवाहन आहे. अद्यापही महाराष्ट्रामध्ये प्रार्थनास्थळं खुली केली नसल्याने मुस्लिम बांधवांना घरातच राहून नमाज अदा करावी लागणार आहे.