Eid-E-Milad un Nabi Mubarak WhatsApp Stickers: ईद- ए- मिलाद उन नबी च्या शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक व्हॉट्सअॅप स्टिकर्स आणि GIFS कशी कराल फ्री डाउनलोड?
रमजान ईद (Ramzan Eid), बकरी ईद प्रमाणेच मुस्लिमांमध्ये ईद-ए-मिलाद उन नबीचे देखील खास महत्व आहे,यानिमित्ताने डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या शुभेच्छा आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहचवू शकता. अलीकडेच WhatsApp Stickersच्या रूपात या सदिच्छांसाठी एक नवा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे.
ईद- ए- मिलाद उन नबी ( Eid-E-Milad un Nabi) जगभरतील मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण म्ह्णून ओळखला जातो. आज 9 नोव्हेंबर च्या संध्याकाळ पासून या सणाची सुरुवात होत आहे तर उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी ईदचा चंद्रमा दिसेपर्यंत हा सोहळा सुरु असणार आहे. रमजान ईद (Ramzan Eid), बकरी ईद प्रमाणेच मुस्लिमांमध्ये ईद-ए-मिलाद उन नबीचे देखील खास महत्व आहे, रबी उल अव्वल महिन्यातील 12 व्या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का (Makka) येथे पैगंबर मोहम्मद यांचा जन्म झाला होता. यादिवशी पैगंबरांच्या शिकवणीची उजळणी केली जाते तसेच नमाज पठण करून त्यांना अभिवादन केले जाते.तसेच आपल्या मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देत गळाभेट दिली जाते. यंदा तुम्हाला ईदच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होणार नसेल तरी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या शुभेच्छा आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहचवू शकता. अलीकडेच WhatsApp Stickersच्या रूपात या सदिच्छांसाठी एक नवा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे.
जगाच्या एका कोपर्यातून दुसर्या कोपर्यापर्यंत सार्यांना जोडणार्या डिजीटल मीडियाच्या युगात व्हॉट्सअॅप, फेसबूक सारख्या मेसेजिंग अॅपचा वापर करून तुम्ही ईद- ए- मिलाद उन नबी च्या शुभेच्छा देऊ शकता. चला तर मग पाहुयात, हे स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे?
Eid-E-Milad un Nabi Mubarak Android Stickers मोफत कशी डाऊनलोड कराल ?
1. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट वर्जन असणं आवश्यक आहे. त्यामुळे गूगल प्ले स्टोअरवरून अॅप अपडेट करून घ्या. त्यानंतर Google Play Store च्या सर्च बॉक्समध्ये 'Eid Mubarak Stickers’ असं सर्च करा. इथे पहा काही खास मराठमोळी स्टिकर्स.
2.Eid Mubarak GIF : Eid Mubarak Sticker For Whatsapp असं सर्च केल्यानंतर तुम्हांला अनेक पर्याय मिळू शकतात. तुम्हांला आवडेल त्या स्टिकर्स पॅकवर क्लिक करून तो इन्स्टॉल करा.
3.इंस्टॉल केल्यानंतर वापरण्यासाठी त्या पॅकला व्हॉट्सअॅपमध्ये अॅड करणं आवश्यक आहे. याकरिता व्हॉट्सअॅपमध्ये पॅक अॅड करण्यासाठी केवळ '+' बटणावर क्लिक करा.
4.तुमचा स्टिकर्स पॅक अॅड झाल्यानंतर Emoji आणि GIF tab मध्ये तुम्हांला Eid Mubarak Sticker मिळू शकतात.
लक्षात घ्या, व्हॉट्सअॅप वर थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने तुम्ही अनेक स्टिकर्स डाऊनलोड करू शकता. केवळ ती स्टिकर्स डाऊनलोड करून तुम्हांला व्हॉट्सअॅपवर अॅड करावी लागतात. मग थेट व्हॉट्सअॅपच्या मदतीने तुम्ही शेअर करू शकता.तसेच तुम्ही स्वतःची क्रिएटीव्हीटी वापरून देखील कस्टमाईज्ड स्टिकर्स बनवू शकाल. यामध्ये फोटो देखील स्टिकर्समध्ये बदलू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)