Eid-e-Milad un Nabi 2024 Mubarak Wishes: ईद- ए- मिलाद उन नबी निमित्त Greetings, SMS, Images, WhatsApp Status द्वारे शेअर करा मराठमोळी शुभेच्छापत्रं!
तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे ग्रेंटिंग्ज शेअर करून मुस्लिम बांधवांना ईद मिलाद उन नबीच्या शुभेच्छा पाठवू शकता.
Eid-e-Milad un Nabi Mubarak Wishes: इस्लाम धर्मात ईद मिलाद उन नबी (Eid-e-Milad un Nabi 2024) हा सण रबिउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेला मिलादुन्नबीच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस आहे. मान्यतेनुसार पैगंबर मोहम्मद यांचा जन्म मक्का येथे झाला होता. असे म्हणतात की अल्लाहने हजरत मोहम्मद यांना त्यांचा अवतार म्हणून पाठवले होते. प्रेषित मोहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ दरवर्षी ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी केली जाते.
यावर्षी, इस्लामिक कॅलेंडरनुसार, ईद मिलाद उन नबी सोमवार, 16 सप्टेंबर रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना ईद मिलाद उन नबी च्या शुभेच्छा देतात आणि गळाभेट घेतात. ईद मिलाद उन नबी निमित्त आम्ही तुमच्यासाठी ईद मिलाद उन नबीचे Greetings, SMS, Images, WhatsApp Status घेऊन आलो आहोत. तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे ग्रेंटिंग्ज शेअर करून मुस्लिम बांधवांना ईद मिलाद उन नबीच्या शुभेच्छा पाठवू शकता.
असे म्हटले जाते की समाजात पसरलेला अंधार, जुगार, लुटमार यामुळे सर्वजण त्रस्त झाले होते. अशा स्थितीत अल्लाहने मोहम्मद साहिबला पृथ्वीवर पाठवले. मोहम्मद साहिब लहान असतानाच मोहम्मद साहिब यांचे वडील वारले. अशा परिस्थितीत त्यांचे पालनपोषण त्यांचे काका अबू तालिब यांनी केले. हजरत मोहम्मद लहानपणापासून अल्लाहच्या पूजेत मग्न असतं. ते मक्केच्या टेकडीची पूजा देखील करत असतं. जेव्हा ते 40 वर्षांचा झाले तेव्हा त्यांना अल्लाहकडून एक संदेश मिळाला, त्यानंतर त्यांनी अल्लाहचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली.
धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची...
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊ ईद ची
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
सर्व मुस्लिम बांधवांना
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा...
माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या खूप खूप शुभेच्छा...
अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…
ईद घेऊन येई आनंद
जोडू मनाशी मनाचे नवे बंध
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
हजरत मोहम्मद यांनी अल्लाहला वचन दिले की ते इस्लाम धर्माचे नेतृत्व करतील. मोहम्मद साहेबांना इस्लाम धर्म लोकांना समजावून सांगताना खूप अडचणींचा सामना करावा लागला असे म्हणतात. त्याला शत्रूंचा जुलूम आणि छळही सहन करावा. परंतु, ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. ते शेवटपर्यंत लोकांना इस्लामचे महत्त्व पटवून देत राहिले.