Dussehra 2022 Ravan Dahan: विजयादशमी निमित्त रावण दहन जरुर करा, तत्पूर्वी त्याचे प्रेरणादायी विचार नक्की जाणून घ्या

Best Ravana Quotes: विजयादशमी (Vijayadashami 2022) या दिवशी रावण दहन केले जाते. असे असले तरी रावण दहन (Dussehra 2022 Ravan Dahan) जरुर करावे. परंतू, त्याच्याकडून जीवनात महत्त्वाचे ठरतील असे काही गुणही घ्यायला हवेत. रावणाकडील गुण नेमके कोणते? घ्या जाणून.

Ravan Dahan (Photo Credit: YouTube)

रामायणातील (Ramayana) दाखल्यांनुसार रावण अनेक ठिकाणी त्याच्या कृत्यांसाठी बदनाम आहे. असे असले तरी त्याच्या नितिमत्ता आणि वर्तन यांना काही गुण (Best Ravana Quotes) आपल्याला नक्कीच द्यावे लागतील. रावण हा राक्षसांचा राजा होता. त्याने केलेल्या चुकीच्या वर्तनाची शिक्षा म्हणून प्रभू रामचंत्रांनी त्याचा वध केला. त्याची आठवण म्हणून दसरा म्हणजेच विजयादशमी (Vijayadashami 2022) या दिवशी रावण दहन केले जाते. असे असले तरी रावण दहन (Dussehra 2022 Ravan Dahan) जरुर करावे. परंतू, त्याच्याकडून जीवनात महत्त्वाचे ठरतील असे काही गुणही घ्यायला हवेत. रावणाकडील गुण नेमके कोणते? घ्या जाणून.

सांगितले जाते की, रावण जरी आसुरांचा राजा असला, त्याच्या अधर्मासाठी तो कुप्रसिद्ध असला तरी प्रभू रामचंद्रांनाही हे माहिती होते की, तो प्रचंड ज्ञानी आहे. रावणाच्या ज्ञान आणि बुद्धीमुळे काही ठिकाणी भगवान राम सुद्धा खूप प्रभावित झाले होते, असे दाखले मिळतात. म्हणूनच त्याचा पराभव केल्यावर प्रभू रामचंद्रांनी रावणाची स्तुती केली आणि भाऊ लक्ष्मणला मरणासन्न रावणाचा आशीर्वाद घेण्यास सांगितले. प्रभू रामाने आपला भाऊ लक्ष्मणाला त्याच्याकडे जाऊन जगाविषयीचे धडे शिकण्यास सांगितले, जे रावणसारख्या विद्वान व्यक्तीशिवाय इतर कोणीही त्याला शिकवू शकले नाहीत. लक्ष्मणाने आपल्या बंधुच्या आदेशाचे पालन केले आणि रवाणाच्या मस्तकाजवळ जाऊन थांबला. पण रावण काहीच बोलला नाही. लक्ष्मण परत रामाकडे परतला. तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितले की जेव्हा आपल्याला काही शिकायचे असेल तेव्हा शिकविणाऱ्याच्या डोक्याजवळ कधीच उभे राहू नये. नेहमी त्याच्या पायाजवळ थांबावे. लक्ष्मण पुन्हा रावणाकडे गेला आणि यावेळी तो त्याच्या पायाजवळ उभा राहिला, लक्ष्मणला त्याच्या पायाजवळ उभे असलेले पाहून रावणाने त्याला रहस्य सांगितले ज्यामुळे एखाद्याचे जीवन यशस्वी होईल. (हेही वाचा, Dussehra 2022 Wishes in Marathi: दसऱ्याच्या मराठी शुभेच्छा WhatsApp Status, HD Greetings, Quotes द्वारा देत साजरी करा विजयादशमी!)

रावणाचे महत्त्वाचे विचार

  • जेव्हा तुम्हाला वाईट गोष्ट करायची असते तेव्हा ती शक्य तितकी पुढे ढकलायला हवी. दरम्यानच्या काळात चांगल्या गोष्टी करण्यावर विशेष भर दिला पाहिजे. या नियमामुळे आपण स्वत:ला आणि इतरांनाही हानी पोहोचण्यापासून सुरक्षीतता मिळवू शकतो.
  • तुमचा सारथी, तुमचा द्वारपाल, तुमचा स्वयंपाकी आणि तुमचा भाऊ यांचे शत्रू होऊ नका, कारण ते कधीही तुमचे नुकसान करू शकतात. सर्वांशी शक्य तितके प्रेमाणेच राहा.
  • तुम्ही नेहमी जिंकता असे समजू नका, जरी तुम्ही सर्व वेळ जिंकलात तरीही. तुमच्यावर टीका करणाऱ्या मंत्र्यावर नेहमी विश्वास ठेवा.
  • मी हनुमानाचा विचार केला तसा तुमचा शत्रू लहान किंवा असहाय्य समजू नका.
  • वैभवासाठी आसुसलेल्या राजाने लोभ डोके वर काढताच त्याचे शमन केले पाहिजे.
  • राजाला कमीत कमी विलंब न करता इतरांचे भले करण्याची संधी दिली पाहिजे.

वाल्मिकींनी रावणाचे वर्णन भगवान शिवाचा महान भक्त असे केले आहे. रामकथा आणि रामकीर्ती यांसारख्या महाकाव्याच्या अनेक लोकप्रिय आवृत्त्यांमध्ये, उल्लेख आढळतो की, रावणाने तपस्वी देवता भगवान शिव यांच्या स्तुतीसाठी रुद्र स्तोत्र रचले. काम (वासना), क्रोध , लोभ, मोह, मद, मत्सर (इर्ष्या), अहंकार, चित्त, मानस (हृदय), बुद्धी ही त्यांची दहा डोकी होती. दहा डोक्यावरून दहा. असा रावण दहा गुणांचा आहे, हीच रावणाची बुद्धी आहे. तुम्ही स्वत:ला या अलौकिक सवयी लावू शकता आणि जीवनात उंची गाठू शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now