Janmashtami Mehndi Designs 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हातावर काढा 'या' सोप्या मेहंदी डिझाईन्स
अशा परिस्थितीत तुम्हीही कान्हा स्पेशल मेहंदी डिझाइन्सच्या मदतीने तुमच्या तळहातावर श्री कृष्णाची सुंदर प्रतिमा तयार करू शकता आणि त्यांची जयंती खऱ्या अर्थाने खास बनवू शकता.
Janmashtami Mehndi Designs 2024: हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2024) या सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार, यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जात आहे. श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मुथरा येथे कान्हाच्या जयंतीचा जल्लोष आणि भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो.
हा सण खास बनवण्यासाठी महिला आणि मुली हाताला मेहंदी लावतात. अशा परिस्थितीत तुम्हीही कान्हा स्पेशल मेहंदी डिझाइन्सच्या मदतीने तुमच्या तळहातावर श्री कृष्णाची सुंदर प्रतिमा तयार करू शकता आणि त्यांची जयंती खऱ्या अर्थाने खास बनवू शकता. (हेही वाचा - Krishna Janmashtami Mehndi Designs 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोर पंख, बासरी, लोण्याने भरलेले मटक्यासह काढा खास मेहंदी डिझाइन (Watch Video))
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हातावर काढा या खास मेहंदी डिझाईन्स -
26 ऑगस्ट 2024 रोजी श्री कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरा येथे जन्माष्टमी साजरी केली जाईल आणि या दिवशी मध्यरात्री मंदिर परिसरात बाल गोपाळाचा अभिषेक आणि पूजा करण्यात येईल. कान्हाचे जन्मस्थान असलेल्या वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरात 27 ऑगस्ट 2024 रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.