Krishna Janmashtami Mehndi Designs 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोर पंख, बासरी, लोण्याने भरलेले मटक्यासह काढा खास मेहंदी डिझाइन (Watch Video)
तुम्ही या मेहंदी डिझाईन्स काढून आपल्या हाताचे सौंदर्य अधिक वाढवू शकता.
Krishna Janmashtami Mehndi Designs 2024: हिंदू धर्मात मेहंदीशिवाय कोणताही सण अपूर्ण आहे. उद्या म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी देशभरात कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2024) चा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जन्माष्टमीनिमित्त आपल्या हातावर खास मेहंदी डिझाईन्स (Krishna Janmashtami Mehndi Designs) काढू शकता. यामध्ये तुम्ही कृष्णाची प्रतिकृती, मोर पीस, बासरी, दही-दुध-तुप-लोण्याचे मटके काढून तुमची मेहंदी आणखी स्पेशल करू शकता.
आम्ही तुमच्यासाठी जन्माष्टमीच्या खास प्रसंगी हातावर काढण्यासाठी काही मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही या मेहंदी डिझाईन्स काढून आपल्या हाताचे सौंदर्य अधिक वाढवू शकता. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोर पंख, बासरी, लोण्याने भरलेले मटक्याची डिझाईन्ल काढण्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओची मदत घेऊ शकता. (हेही वाचा - Krishna Janmashtami 2024 Rangoli Designs: गोकुळाष्टमीच्या दिवशी तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात ही सोपी आणि सुंदर रांगोळी डिझाइन काढा)
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हातावर काढा या खास मेहंदी डिझाईन्स -
जन्माष्टमीच्या दिवशी हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही मोरपंख, बासरीची डिझाइन देखील निवडू शकता. तुम्ही ही डिझाईन मागच्या हातावर किंवा तळहाताच्या दोन्ही बाजूंना सहज काढू शकता.