Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Speech: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांसाठी खास भाषणांचे नमुने

त्यामुळे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक चिमुकले, विद्यार्थी बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जीवनकार्यावर भाषणं करतात.

Dr. Babasaheb Ambedka | (Photo Credits: Wikipedia Commons)

6 डिसेंबर हा बौद्ध धर्मियांसाठी महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) म्हणून हा दिवस पाळला जात असल्याने या निमित्ताने बौद्ध धर्मीय मुंबईत चैत्यभूमीवर तसेच नागपूरातही चैत्यभूमीत एकत्र जमून महामानवाला आपलं अभिवादन अर्पण करतात. दरम्यान या दिवसाचं औचित्य साधून अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बाबासाहेबांनी कायमच बौद्ध धर्मीयांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक चिमुकले, विद्यार्थी बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जीवनकार्यावर भाषणं करतात, लेख लिहतात, निबंध लिहितात. मग तुम्हांलाही या निमित्ताने शाळा किंवा आजुबाजूच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत भाषण द्यायचं असल्यास जाणून घ्या त्यांच्यावर आधारित भाषणाचे काही नमुने-

बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषणं

 

महापरिनिर्वाण म्हणजे काय?

महापरिनिर्वाण हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ मुक्ती असा होतो. बौद्ध धर्मातील प्रमुख तत्त्वे आणि उद्दिष्टांपैकी तो एक आहे. याचा अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण'. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त होईल आणि तो जीवन चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी हा दिवस महापरिनिर्वाण म्हणून संबोधला जातो. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन 6 डिसेंबर 1956 दिवशी झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif