Happy Gudi Padwa 2024 Wishes In Marathi: गुढी पाडव्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा नववर्षाचा आनंद

तुम्ही देखील गुढी पाडव्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा शेअर करत आपल्या मित्र-परिवारास खास मराठी नववर्षाच्या शुभेच्छा द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Gudi Padwa 2024 Wishes (PC- File Image)

Happy Gudi Padwa 2024 Wishes In Marathi: हिंदू धर्मात गुढीपाडव्यापासून (Gudi Padwa 2024) नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातही गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुढीपाडव्याला म्हणजेच चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला लोक घरोघरी गुढीला विजय पताका म्हणून सजवतात. असे मानले जाते की गुढीपाडव्याचा सण साजरा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासाठी खांबावर पितळेचे भांडे उलटे ठेवून त्यावर लाल, पिवळे आणि भगवे रेशमी कापड बांधले जातात. या दिवशी लोक एकमेकांना मराठी नववर्षाच्याही शुभेच्छा देतात. तुम्ही देखील गुढी पाडव्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा शेअर करत आपल्या मित्र-परिवारास खास मराठी नववर्षाच्या शुभेच्छा द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

नवीन पल्लवी वृषलतांची,

नवीन आशा नववर्षाची,

चंद्रकोरही नवीन दिसते,

नवीन घडी ही आनंदाची,

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

Gudi Padwa 2024 Wishes (PC- File Image)

नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद,

सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

Gudi Padwa 2024 Wishes (PC- File Image)

नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या

स्वप्नांना मिळो नवी भरारी,

आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा…नववर्षाच्या निमित्ताने आज !

Gudi Padwa 2024 Wishes (PC- File Image)

आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला

चला करू पुन्हा नव्याने सुरूवात

एका चैतन्याच्या अध्यायाला..

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

Gudi Padwa 2024 Wishes (PC- File Image)

नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..

तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!

Gudi Padwa 2024 Wishes (PC- File Image)

असे मानले जाते की ज्या दिवशी प्रभू रामाने बळीचा वध केला तो हा चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदा दिवस होता. म्हणून दरवर्षी हा दिवस दक्षिणेत गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि विजयाची गुढी उभारतात. आजही गुढीपाडव्याला ध्वजारोहणाची परंपरा कायम आहे.