Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Schedule: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानच्या वेळेत बदल; पहा कधी निघणार पालखी
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दरवर्षी ज्येष्ठ कृष्ण अष्टमी दिवशी प्रस्थान ठेवणार आहे. यंदा ज्येष्ठ कृष्ण अष्टमी ही 19 जून दिवशी आहे.
Pandharpur Ashadhi Wari 2025: आषाढी वारीची (Ashadhi Wari) धामधूम सध्या सुरू आहे. येत्या 8-9 दिवसांमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यंदा आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या (Dnyaneshwar Maharaj Palkhi) प्रस्थान सोहळ्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहे. दरवर्षी माऊलींची पालखी पंढरपूर कडे दुपारी 4 च्या सुमारास प्रस्थान ठेवणार आहे. पण यंदा ही पालखी रात्री 8 नंतर निघणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याचा दिवस गुरूवार आल्याने पालखी प्रस्थानच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून दिवशी प्रस्थान ठेवणार आहे. मंदिरात पालखी प्रस्थान ठेवण्यापूर्वी मंदिरातील धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरात निघणारी गुरूवारची पालखी, प्रदक्षिणा आणि आरती होणार आहे. गुरुवारी निघणारी पालखी सूर्यास्तापूर्वी संपवली जाईल. त्यानंतर आरती झाल्यावर मुख्य प्रस्थान सोहळा सुरू होणार असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांकडून देण्यात आली आहे.
मानाच्या 47 दिंड्यांसह देऊळवाड्यातून पालख्या प्रस्थान ठेवणार आहेत. 19 जूनला पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 जूनला सकाळी माऊलींचा सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. नक्की वाचा: Pandharpur Wari 2025 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Time Table: आषाढी वारी मध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान कधी? जाणून घ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण वेळापत्रक .
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दरवर्षी ज्येष्ठ कृष्ण अष्टमी दिवशी प्रस्थान ठेवणार आहे. यंदा ज्येष्ठ कृष्ण अष्टमी ही 19 जून दिवशी आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. यंदा आषाढी एकादशी 6 जुलै दिवशी आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2025 10:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

