Diwali Padwa 2020: दिवाळी पाडव्यानिमित्त अभिजीत खांडकेकर, आदिनाथ कोठारे यांनी आपल्या पत्नीसह काढलेले खास फोटो केले सोशल मिडियावर शेअर, See Pics

हे फोटोज त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Marathi Celebrities Diwali Padwa (Photo Credits: Instagram)

दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2020) विवाहित जोडप्यांसाठी फार खास असतो. या दिवशी पत्नी आपल्या पतीराजांना ओवाळते आणि पती आपल्या प्रिय पत्नीस पाडव्यानिमित्त काही खास भेटवस्तू देतो. यात पत्नीही आपल्या पतीस भेटवस्तू देते. म्हणूनच या सणाची एक वेगळीच गंमत असते. यामुळे विवाहित स्त्रियांमध्ये या दिवशी विशेष उत्साह असतो. यंदा हा पाडवा 16 नोव्हेंबरला म्हणजेच आज साजरा केला जात आहे. या दिवशी विवाहित जोडपी छान पारंपारिक वेशभूषा करुन हा सण साजरा करतात. मग यात मराठी सेलिब्रिटी जोडपी कशी बरं मागे राहतील. यंदा पाडव्यानिमित्त अभिजीत खांडकेकर-सुखदा खांडकेकर (Abhijeet Khandkekar-Sukhada Khandkekar) आणि आदिनाथ कोठारे-उर्मिला कोठारे (Adinath Kothare-Urmila Kothare) यांनी खास फोटो काढले आहेत. हे फोटोज त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

यात अभिजीत आपल्या पत्नीस सुखदा हिला अंगठी घालताना दिसत आहे. यात दोघांच्या चेह-यावरचा आनंद त्यांचा या दिवसाचा उत्साह सांगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh)

तर दुसरीकडे आदिनाथ कोठारे झोपाळ्यावर बसला असून उर्मिला ने त्याच्या गळ्यात हात टाकून छान रोमँटिक फोटोशूट केले आहे.हेदेखील वाचा- Diwali Padwa 2020 Wishes in Marathi: दिवाळी पाडव्यानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, GIF's शेअर करुन पती-पत्नीच्या नात्याचा दिवस करा खास!

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

या फोटोंवरुन यंदा मराठी सेलिब्रिटींमध्येही पाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा पहिलाच पाडवा असलेल्या काही मराठी सेलिब्रिटी जोड्या काय विशेष करतात याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू.