Diwali Mahalaxmi Aarti 2022: लक्ष्मी पूजन करा या मंगलमय आरतीने आणि करा महालक्ष्मी मातेला प्रसन्न
दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही देखील लक्ष्मी पुजन करणार असाल तर जाणून घ्या दिवेलागणीच्या वेळेस तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करू शकता.
Diwali Laxmi Aarti in Marathi: भारतामध्ये मोठ्या धामधुमीत साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी (Diwali). गेली दोन वर्ष आपन कोरोना या आजाराने वेधुन होतो त्यामुळे दिवाळी सण काय साजरा करता आला नाही. पण या वर्षी कुठल्याही निर्बधा शिवाय आपन हा सण साजरा करतो आहोत. दरम्यान या दीपोत्सवाच्या (Deepotsav) आनंदात सहभागी होत संध्याकाळी आर्थिक सुबकता आणि भरभराटीसाठी लक्ष्मी मातेची पूजा केली जाणार आहे. कारण या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीचे दर्शन झाले. या कारणास्तव या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. दिवाळीच्या संध्याकाळी पंचांगानुसार शुभ मुहूर्तावर गणेश-लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते.
दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही देखील लक्ष्मी पुजन करणार असाल तर जाणून घ्या दिवेलागणीच्या वेळेस तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करू शकता. मंगलमय वातावरण रहावं म्हणून घरात मंद आवाजात लक्ष्मीची आरती लावून सहाकुटुंब लक्ष्मी पुजन करू शकाल. (हे देखील वाचा: Diwali 2022 Muhurat Puja Vidhi: दिवाळीला बनला आहे शुभ योग, जाणून घ्या गणेश-लक्ष्मी पूजेचा मुहूर्त आणि पूजाविधी)
॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी...॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी...॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी...॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी...॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी...॥
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)