युएईमध्येही दिवाळी उत्साहात; लक्ष लक्ष दव्यांनी उजळली बुर्ज खलीफा

दुबई पोलीसांचे बँडपथक भारताचे राष्ट्रगीत वाजवताना पहिल्यांदाच पाहायला मिळाले. युएईस्थित भारतीयांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.

युएईमध्ये दिवाळीचा उत्साह जोरात, लक्ष लक्ष दव्यांनी सजली बुर्ज खलीफा (Photo Credit : Twitter)

यूनाइटेड अरब अमिराती (UAE)मध्ये यंदाची दिवळी पहिल्यांदाच काहीशा हटके पद्धतीने साजरी करण्यात आली. दुबई सरकारने भारताचे काऊन्सिलेट जनरल यांच्यासोबत पहिल्यांदाच तब्बल 10 दिवस दिवाळी साजरी केली. यूएईचे मुख्य शहर असलेल्या दुबई शहरातही दिवाळीचा जोरदार उत्साह दिसत आहे. खास करुन जगातील सर्वात उंच अशी ओळख असलेली इमारत बुर्ज खलीफा दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. दुबईमध्ये सुमारे 25 लाख भारतीय लोक राहतात. दुबई पोलीसांचे बँडपथक भारताचे राष्ट्रगीत वाजवताना पहिल्यांदाच पाहायला मिळाले. युएईस्थित भारतीयांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.

दुबईमध्ये 1 ते 10 नोव्हेंबर(शनिवार)पर्यंत दिवाळीचा उत्साह कायम राहणार आहे. दरम्यान, युएईचे उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांनी हिंदीमध्ये ट्विट करुन भारतीयांना दिवाळी शुभेच्छा दिल्या. (हेही वाचा, अमेरिका: व्हाईट हाऊसवर यंदा दिवाळी नाही; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंधरा वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत)

दरम्यान, जगातील सर्वात उंच अशी ओळख असलेली बुर्ज खलीफा दिव्यांच्या रोषणानाईने उजळून निघाली. तर, दुबईतील बॉलिवूड पार्कमध्ये कलाकार बॉलिवूडच्या गाण्यांवर भांगडा करताना दिसले.

युएईचे उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांनी हिंदीमध्ये ट्विट करुन भारतीयांना दिवाळी शुभेच्छा दिल्या.

अमिराती एअरलाईन्सने ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक भारतीयांनी लाईक आणि शेअरही केला आहे.

दुबई टुरिजम डिपार्टमेंटने दिवाळी सेलिब्रेशनचे काही व्हिडिओही ट्विट केले आहेत. याशिवाय अमिराती एअरलाईननेही आपल्या खास अंदाजात दिवाळी साजरी केली. सांगितले जाते की, युएईच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतियांश (25 लाख) जनता ही भारतीय आहे.