Happy Diwali 2020 Wishes in Marathi: दिवाळीच्या मराठी शुभेच्छा HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरी करा नरक चतुर्दशी!

त्यामुळे यंदा दिवाळीचा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. यंदा दीपावलीच्या सणानिमित्त मराठी संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना खास शुभेच्छा नक्की द्या.

Diwali Wishes in Marathi | File Image

Happy Diwali Wishes in Marathi:   दीपावली (Diwali) हा भारतातील एक प्रमुख सण आहे. त्ययामधील आज  नरक चतुर्दशीचा पहिला दिवस. आज दीपावलीच्या दिवशी घरोघरी लक्ष्मीमातेची पूजा करून दिवे लावले जातात. याशिवाय घरासमोर उंच जागी आकाशकंंदील लावला जातो. याशिवाय सर्व घर सुशोभित करून घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. पावसाळा संपल्यानंतर नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या मध्यात दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदा 14 नोव्हेंबरला लक्ष्मी पूजन केलं जाणार असून या दिवशी नरक चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. Happy Diwali 2020 Wishes: दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश WhatsApp Status,Facebook Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा प्रियजनांचा दीपावलीचा आनंद.

यंदा दिवाळीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदा दिवाळीचा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. यंदा दीपावलीच्या सणानिमित्त मराठी संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील फोटोज नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Laxmi Pujan 2020 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण हा आला

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा!

Diwali Wishes in Marathi | File Image

उटण्याचा मंद सुगंध घेऊन,

आली आज नरक चतुर्दशीची पहाट,

पणतीतल्या दिव्याच्या तेजाने,

उजळेल आयुष्याची वहिवाट

तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali wishes in Marathi | File Image

 

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी

तुमच्या घरी घर सुख समृद्धी येऊ दे

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Wishes in Marathi | File Image

गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,

दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!

Diwali Wishes In Marathi | File Image

उत्कर्षाची वाट उमटली

विरला गर्द कालचा काळोख

क्षितिजावर पहाट उगवली

घेऊनिया नवा उत्साह

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!

Diwali Wishes in Marathi | File Image

लहानांपासून मोठ्यांपर्यंत दीपावलीचा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. दीपावली सणानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या सहा दिवसात दीपावलीदरम्यानचे सण साजरे होतात. दीपावलीचा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येतो.



संबंधित बातम्या