Diwali 2019: यंदा दिवाळीला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे आकर्षक तोरण लावून सजवा तुमचे घर; या सोप्प्या ट्रिक्स करतील मदत (Watch Video)

तुम्हीही झेंडूच्या फुलांपासून आणि आंब्यांच्या पानापासून तोरण बनवायचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या सोप्प्या ट्रिक्स वापरून तुम्ही आकर्षक तोरण बनवू शकता.

Zendu Toran (Photo Credits: Youtube)

Diwali 2019: आज संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा होत आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन कृष्ण चतुर्दशी दिवशी नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीमध्ये नरक चतुर्दशी दिवशीच संध्याकाळी लक्ष्मी पूजन पार पडणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणाचा आनंद आणि सेलिब्रेशन डबल होणार आहे. आज प्रत्येकाच्या घरी दिवाळीची सजावट सुरू असेल. अनेक जण आपल्या घराला विविध प्रकारची तोरण बनवत असतील. तर काहींनी बाजारात मिळणारी तोरण विकत घेतली असतील. झेंडूची फुले आणि आंब्यांच्या पानापासून बनवण्यात येणारे तोरण घराला लावल्यावर मन अगदी प्रसंन्न होऊन जातं. तुम्हीही झेंडूच्या फुलांपासून आणि आंब्यांच्या पानापासून तोरण बनवायचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या सोप्प्या ट्रिक्स वापरून तुम्ही आकर्षक तोरण बनवू शकता.

हेही वाचा  - Happy Narak Chaturdashi 2019 Images: नरक चतुर्दशी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन 'दीपावली' च्या शुभेच्छा!

दिवाळीच्या दिवशी आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांचा वापर करून बनवलेल्या तोरणाला खास महत्व असते. साहजिकच त्यामुळे सण जवळ आला की, या वस्तूंची किंमत वधारायला सुरुवात होते. रेडिमेड तोरण आणायचे म्हणजे खिश्याला चांगलीच कात्री बसते. हे सर्व टाळण्यासाठी घरच्या घरी बनवलेले तोरण उत्तम उपाय आहे.

सामग्री:

झेंडूची फुले (पिवळी, विटकरी, नारंगी) आंब्याची पाने, जाड दोरा, सुई

झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांचे तोरण बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही जी फुले पाने वापरणार आहात त्यांचा आकार शकतो समान असेल याची काळजी घ्या. तुम्ही घेतलेली फुले आणि पाने स्वच्छ असणे आवश्यक आहे. यामध्ये सुकलेली पाने किंवा फुले वापरू नये. त्यामुळे तुमचे तोरण चांगले दिसणार नाही. तसेच ते लवकर खराब होईल.