Dhanteras 2020 Wishes in Marathi: धनत्रयोदशीच्या Messages, WhatsApp Status द्वारे मराठीतून शुभेच्छा देऊन धनतेरसचा आनंद करा द्विगुणित!
त्यासाठी तुम्ही एव्हाना गुगलवर मेसेजेस ही शोधत असाल. तुमचे हे काम सोपे करण्यासाठी तुम्हा सर्वांसाठी खास धनतेरसच्या मराठीतून शुभेच्छा संदेश
Happy Dhanteras 2020 Wishes: यंदा दिवाळीचा पहिला दिवस आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला आली आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला देशभरात धनत्रयोदशी (Dhantrayodashi) साजरी केली जाईल. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. आपल्या घरावर तिची कृपादृष्टी कायम राहून कधीही धनाची कमी पडू नये उलट भरभराट होवो यासाठी धन्वंतरीची पूजा करतात. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा आपल्याला कोरोना व्हायरसमुळे घराबाहेर पडून मोठ्या जल्लोषात हा उत्साह साजरा करता येत नसला तरीही आपण मेसेजेस, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून एकमेकांना धनतेरच्या शुभेच्छा (Dhanteras Messages) देऊ शकता.
यासाठी तुम्हाला छान मराठीतून असलेल्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छांची गरज असेल. त्यासाठी तुम्ही एव्हाना गुगलवर मेसेजेस ही शोधत असाल. तुमचे हे काम सोपे करण्यासाठी तुम्हा सर्वांसाठी खास धनतेरसच्या मराठीतून शुभेच्छा संदेश
धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
हेदेखील वाचा- Diwali 2020: धनतेरस च्या दिवशी का खरेदी करतात सोने-चांदी किंवा तांब्या-पितळाची भांडी? जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त
तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!
आला आला दिवाळीचा सण
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!
पौराणिक मान्यतेनुसार धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेवून यंदा धनाची पूजा करण्यासोबत आपल्या आप्तेष्ठांना धनतेरसचे शुभेच्छा संदेश पाठविण्यास देखील विसरू नका. बरं का!