Datta Jayanti 2020: आज साजरी होणार दत्त जयंती, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि कथा
भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जातात.
Datta Jayanti 2020: आज सर्वत्र दत्त पौर्णिमा साजरी होत आहे. हिंदू धर्मात दत्त पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथानुसार, भगवान दत्तात्रेयांचा जन्म या दिवशी झाला होता. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जातात. त्यामुळे दत्त पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची पूजा केली जाते. तुम्हालाही दत्तात्रेय जयंती साजरी करायची असेल, तर खालील शुभ मुहूर्तावर तुम्ही दत्तात्रेयांची प्रार्थना करू शकता.
दत्त जयंती पूजा शुभ मुहूर्त -
आज पौर्णिमा सकाळी 07:54 वाजता सुरू होते. त्यामुळे तुम्ही यावेळेनंतर पूजा सुरू करू शकता. तसेच रात्री 08:57 पर्यंत पौर्णिमा संपते. त्यामुळे तुम्ही यावेळेअगोदर कधीही पुजा करू शकता. म्हणजेचं आज सकाळी 07:54 ते रात्री 08:57 या वेळेत तुम्ही कधीही पूजा करू शकता. (हेही वाचा - Datta Jayanti 2020 Wishes in Marathi: दत्त जयंती निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Wallpapers, Messages, Images, Greetings पाठवून भक्तांना द्या खास शुभेच्छा!)
पौराणिक मान्यतांनुसार, भगवान दत्तात्रेयांचे 3 डोके आणि 6 हात आहेत. दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी भगवंताची उपासना केली जाते. तसेच, भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूच्या 24 अवतारांमधील सहावे मानले जातात. दत्तात्रेय असाच एक अवतार आहे, ज्यांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले. महाराज दत्तात्रेय आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबर होते. भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आला आहे. (Datta Jayanti 2020 Messages in Marathi: दत्त जयंती निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp, Facebook वर शेअर करुन दिवस करा मंगलमय!)
दत्त जयंती कथा -
एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवले. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात. यावेळी ते भिक्षा म्हणून स्तनपान करण्याची मागणी करतात. परंतु, माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते आणि स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवतात व वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय यांना ओळखले जाते.