Dahi Handi HD Images 2021: दही हंडी निमित्त मराठमोठ्या शुभेच्छा, Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून साजरा करा गोपाळकाला
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सव म्हणजे जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असे म्हटले जाते. वकी पुत्र भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्यातील पंधरवड्याच्या आठव्या दिवशी झाला.
Dahi Handi HD Images 2021: भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सव म्हणजे जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असे म्हटले जाते. वकी पुत्र भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्यातील पंधरवड्याच्या आठव्या दिवशी झाला. या दिवशी भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचा आठव्या अवतारात पृथ्वीतलावर अवतरले आणि दुष्टता दूर करण्यासाठी येथे दाखल झाले. संपूर्ण देश भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने आणि उत्कटतेने साजरा करण्यासाठी एकत्रित जमतात. तर लहान मुले श्रीकृष्णाचा वेश परिधान करतात, मिठायांची रेलचेल असते.
दहीहंडी हे जन्माष्टमी उत्सवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. गोकुळाष्टमी माहिती अनुसार या दिवशी, 'दही' आणि 'लोणी' ने भरलेली 'हंडी' किंवा मातीची भांडी उंच ठिकाणी बांधली जातात. भव्य हंडीने भरलेले बाजार, दहीहंडीची तयारी करणारी पथकं आणि फुलांनी सजलेली मंदिरे हे चित्र सगळीकडे दिसते. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे दही हंडीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. तर यंदाच्या दही हंडी निमित्त मराठमोठ्या शुभेच्छा, Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून साजरा करा गोपाळकाला.(Krishna Janmashtami 2021 Fancy Dress Ideas: गोकुळाष्टमीच्या दिवशी मुलांना राधा-कृष्ण सारखे तयार करण्यासाठी या सोप्प्या वेशभूषा जरुर करुन पहा)





(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2021 07:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

