Dahi Handi 2024 Wishes In Marathi: दहिहंडीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Quotes द्वारा देत साजरा करा गोपाळकाल्याचा दिवस

दहीहंडी हा गोपाळकाल्याचा दिवस असतो.

Dahi Handi Wishes | File Image

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव (Shri Krushn Janmotsav) साजरा केला जातो आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी दहिहंडीचा (Dahi Handi) उत्सव साजरा करून जल्लोष करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रामध्ये गल्लोगल्ली दहीहंडीचा थरार रंगत असतो. दहा थरांपर्यंत मानवी मनोरे बांधून दही हंडी फोडण्याचा थरारक खेळ आता मोठ्या स्वरूपात आयोजित केला जातो. भगवान श्रीकृष्णाला माखनचोर देखील म्हटलं जातं. त्यामुळे दहिकाल्याचा आनंद घेतला जातो. मग असा हा श्रीकृष्णाच्या भाविकांसाठी खास असलेला सण अजून जल्लोषात साजरा करण्यासाठी तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजनांना खास शुभेच्छापत्र, Wishes, Messages, Greetings, Quotes पाठवून हा सण साजरा करू शकता.

मुंबई सह महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी उंच उंच दहीहंडी बांधून ती फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगते. यासाठी लाखो आणि कोटींची बक्षिसं देखील दिली जातात. त्यामुळे काळजाचा ठाव घेणारा हा रोमहर्षक खेळ पाहण्यासाठी देशा-परदेशातून लोकं येतात. Krishna Janmashtami 2024 Wishes in Marathi: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Quotes, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी.  

दहीहंडीच्या शुभेच्छा

विसरून सारे मतभेद
लोभ अहंकार दूर सोडा
सर्वधर्म समभाव मनात जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा
दहिहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

खिडकीतल्या ताई अक्का पुढं वाकू नका,
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
दहीहंडीच्या शुभेच्छा

दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

हंडीवर आमचा डोळा…
ह्या दुधाचा काला..
हे नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा…
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

यंदा श्रीकृष्ण जन्मोत्सव 26 ऑगस्ट आणि दहिहंडीचा खेळ 27 ऑगस्ट दिवशी खेळला जाणार आहे. दहीहंडी हा गोपाळकाल्याचा दिवस असतो.   भगवान कृष्ण हे श्री विष्णू किंवा नारायणाचा आठवा अवतार आहेत, जे त्रिमूर्तींपैकी एक आहे. श्रीकृष्ण गायी चारताना स्वत:ची व सवंगड्यांनी घरून आणलेल्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला करुन सर्वांसह भक्षण करत असे. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.



संबंधित बातम्या