IPL Auction 2025 Live

Dahi Handi Quotes In Marathi: दहीहंडी च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत साजरा करा श्रीकृष्ण जन्मोत्सव

दहीहंडीच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, गोविंदा पथकामधील मित्र मैत्रीणींसोबत शेअर करत हा श्री कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा.

Dahi Handi | File Image

श्रीकृष्ण जन्मोत्सवानंतर दहीहंडी फोडून भगवान श्रीकृष्ण यांच्या जयंतीचा Sri Krishna Jayanti)  सोहळा देशभर साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये दहीहंडी (Dahi Handi) सणाचं आकर्षण आहे. या निमित्ताने गल्लोगली गोविंदा पथकं मानाच्या हंड्या फोडण्यासाठी फिरत असतात. त्यांच्यावर आयोजकांकडून बक्षीसांची मोठी बरसात होत असतो. कोटींच्या बक्षीसांसाठी हा थरारक खेळ खेळला जातो. मग तुमच्या गोविंदा पथकातील मित्रमंडळींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना दहीहंडीच्या शुभेच्छा देत हा सण साजरा करण्यासाठी ही खास शुभेच्छापत्रं डाऊनलोड करून WhatsApp Status, Facebook Messages, Dahi Handi Quotes In Marathi, Dahi Handi Caption

याद्वारा तुम्ही दहीहंडीचा दिवस साजरा करू शकता.

दहीहंडी म्हणजे मडक्यामध्ये दही भरून ती उंचावर बांधली जात असे. त्यानंतर गोविंदा पथकं ती फोडण्यासाठी थर लावतात. हा एक साहसी खेळ आहे. पूर्वी केवळ प्रातिनिधिक स्वरूपात खेळला जाणारा हा खेळ पुढे अधिक ग्लॅमरस झाला. आंतरराष्ट्रीय खेळाडूंप्रमाणे त्याचं रीतसर प्रशिक्षण घेऊन गोविंदा पथकं सराव करू लागली. पण या खेळातील अपघात पाहता कोर्टाने त्याच्याशी निगडीत आता अटी नियम वाढवले आहेत. पण हा थरारक खेळ मुलं आणि मुली अशा दोन्ही स्वतंत्र

गोविंदा पथकांकडून खेळला जातो. Unique Baby Names From Lord Krishna: श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवा मुलांची युनिक नावे, जाणून घ्या त्यांचे अर्थ. 

दहीहंडीच्या शुभेच्छा

जल्लोषात आणि आनंदात
चैतन्याची फोडा हंडी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

दहिहंडी आणि गोपाळकाल्याचा
हार्दिक शुभेच्छा

जोशात साजरा करू गोकुळाष्टमीचा सण
हे आला रे आला गोविंदा आला

थराला या
नाहीतर,
धरायला या
आपला समजून,
गोविंदाला या
दहिहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
(नक्की वाचा: Celebrations of Sri Krishna Janmashtami 2024 ISKCON Juhu: मुंबई मधील इस्कॉन जुहू मध्ये जन्माष्टमीचा सोहळा कुठे, कधी पाहू शकाल?) 

दहीहंडी निमित्त दुध, दही, तूपाचे विविध पदार्थ बनवले जातात. देशात विविध प्रांतानुसार खाद्यसंस्कृती वेगळी असल्याने दहीहंडीला पदार्थही खास असतात. काही ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला 56 भोग चढवण्याची देखील पद्धत आहे.