Diwali Decoration 2023: सजावटीचे पाच उत्तम पर्याय दिवाळी घर सजवण्यासाठी, अगदी झटपट करा दीपावलीची तयारी
घर सजावल्याशिवाय दिवाळी हा सण अपुराचं म्हणावं. लायटींग लावून झाल्यावर आणखी घर कस सजवायचं. तर तुम्हाला ही हाच प्रश्न पडला आहे ना?
Diwali Decoration 2023: दिवाळीची लगलब सगळीकडेच सुरु आहे. दिवाळी म्हटलं की पहिला प्रश्न पडतो तो साफसफाई झाल्यावर घरात सजावट कशी करायची? प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो.दरवर्षी सजावटीसाठी नवनवीन गोष्टी खरेदी कराव्या लागतात.घर सजवणे हा एक मोठा मुश्लिक टास्क असतो. आईचा फराळ बनवून झाला की घर सजवण्यात ती व्यस्त होते. पण यंदा काही तरी नवीन सजावट करण्यासाठी खास आयडीया घेऊन आलो आहोत. घर सजावल्याशिवाय दिवाळी हा सण अपुराचं म्हणावं. लायटींग लावून झाल्यावर आणखी घर कस सजवायचं. तर तुम्हाला ही हाच प्रश्न पडला आहे ना? अश्या पध्दतीनं घर सजवा
१. रांगोळी कला ही पारंपारिक आहे. घराच्या समोर रांगोळी काढून घर सजवणे हा एक उत्तम पर्याय आहे. पण युनिक सजावटीसाठी घरासमोर तुम्ही विविध फुलांचा वापर करून किंवा झेंडूंच्या पिवळी आणि नारंगी फुलाचा वापर करून रांगोळी बनवा. हा पर्याय लेटेस्ट असल्यामुळे घर देखील आकर्षित दिसेल. घरासमोर फुलांच्या रांगोळीने गोल वर्तुळाकार किंवा बॉर्डर फुलांची रांगोळी शोधून उठेल. या मध्ये फुलांच्या पाकळ्यांचा वापर देखील करून सुंदर रेखाकृती बनवू शकता.
२. मेणबत्ती लावून घर सजवणे हा एक अनोखा पर्याय होवू शकतो. बाजारातील नवनवीत किंवा वेगवेगळ्या आकाराच्या मेणबत्तीचा वापर करून घर सजवू शकतो. घरातील एका कॉर्नरमध्ये वेगवेगळ्या मेणबत्तीचा वापर केला जाऊ शकतो. या मध्ये सुंगधीत मेणबत्तीचा वापर जरूर करा घरात सुवासाठी आणि फ्रेंगरेंस् साठी वापरू शकता.
३. घराच्या दाराला फुलांचे तोरण लावणे हे सजावटीसाठी उत्तम पर्याय आहे. या देखील बाजारात नवनवीन पर्याय उपलब्ध आहे. मिरर् वर्क तोरण, शिंपल्यांचे तोरण, लोकरी आणि मोतीचे तोरण यांचा समावेश करा.
४. लायटिंगमध्ये अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहे. एका भिंतीवर लायटिंग सोडून घरात शोधा वाढवा, त्यासोबत बाजारात उपलब्ध असलेले अनेक वेगवेगळे लायटिंगचा वापर करा,
५. घरात शोपिसचे साठी लहन मोठे रोपटी लावा. यात शोपिसचे बाजारात उपलब्ध असलेले अनेक रोपटी घेऊन घरातील एका कॉर्नरमध्ये ठेवा. घरातील शोधा वाढेल यात लायटिंग सोडल्यावर उत्तम दिसेल.